शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
4
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
5
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
6
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
7
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
8
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
9
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
10
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
11
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
12
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
13
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
14
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
15
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
16
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
17
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
18
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
19
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
20
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका

बंजारा समाजाचा आक्रोश मूक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 00:44 IST

हनुमंतखेडा, ता. सोयगाव येथील सीमा राठोड या अल्पवयीन मुलीचा निर्घृण खून करणाºया नराधमांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, या प्रमुख मागणीसाठी आज हनुमंतखेडा अत्याचार विरोधी कृती समितीने बंजारा आक्रोश मूक मोर्चा काढला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : हनुमंतखेडा, ता. सोयगाव येथील सीमा राठोड या अल्पवयीन मुलीचा निर्घृण खून करणाºया नराधमांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, या प्रमुख मागणीसाठी आज हनुमंतखेडा अत्याचार विरोधी कृती समितीने बंजारा आक्रोश मूक मोर्चा काढला. तो भव्यदिव्य ठरला, लक्ष वेधून घेणारा ठरला. या मोर्चाने बंजारा समाजाची जणू ताकदच दाखवून दिली. मोर्चात बंजारा तरुण- तरुणींचा सहभाग लक्षणीय होता. विधानपरिषदेचे सदस्यद्वय प्रा.जोगेंद्र कवाडे व हरिभाऊ राठोड हे मोर्चात पायी चालले. सीमा राठोडचे आई- वडीलही या मोर्चात सहभागी झाले होते. पण कृती समितीच्या निर्णयानुसार तीन मुलींव्यतिरिक्त मोर्चाच्या समारोपस्थळी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर झालेल्या सभेत अन्य कुणीही बोलले नाही. विभागीय आयुक्तांना मागण्यांचे निवेदन या मुलींनीच दिले.सकाळपासून औरंगाबादचा क्रांतीचौक बंजारा स्त्री- पुरुषांनी फुलत होता. तांड्यातांड्यातून बंजारा बंधू-भगिनी येतच राहिल्या. सकाळी ११ वाजता निघणारा हा मोर्चा दुपारी १ च्या सुमारास क्रांतीचौकातून मार्गक्रमण करू लागला. दोन दोनच्या रांगेत शिस्तीत हा मोर्चा सुरू झाला. मोर्चाच्या अग्रभागी भलेमोठे बॅनर धरून पारंपरिक वेशभूषेतील बंजारा महिला चालत होत्या. त्यापाठोपाठ बंजारा तरुणी चालत होत्या. नंतर मोठ्या संख्येने सहभागी झालेला बंजारा तरुण वर्ग होता. जवळपास प्रत्येकाच्याच हातात ‘ जय सेवालाल’चे झेंडे होते आणि बहुतेकांच्या हातात मागण्यांचे फलक झळकत होते. अनेक स्त्री- पुरुषांच्या डोक्यावर टोप्या होत्या आणि त्यावर ‘सीमा राठोडच्या मारेकºयांना फाशी द्या’ असे लिहिलेले होते.यापुढे सीमा राठोड घडणार नाहीमूक मोर्चा असल्यामुळे कुणीही घोषणाबाजी केली नाही. शहराच्या प्रमुख रस्त्यांवरून हा मोर्चा दुपारी अडीचच्या सुमारास विभागीय आयुक्तालयावर धडकला. तेथील भव्य पटांगणात मोर्चेकरी बसून गेले. तेथे झालेल्या सभेत रविना राठोड, वृंदा पवार व भारती राठोड या तीन मुलींनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. तिघींनीही जय सेवालाल म्हणत आपल्या भाषणाचा शेवट केला. रविना राठोड म्हणाली, सीमा राठोडसारखी वेळ कुणावरही येऊ नये.महिलांना पुरुषांच्या बरोबरीने स्थान दिले जाते, असे सांगितले जाते, पण स्त्रियांना माणूस म्हणून जगण्याचा तरी अधिकार आहे काय? हा खरा प्रश्न आहे. दररोज स्त्रियांवर अन्याय- अत्याचार होतच आहेत. पण यापुढे तरी सीमा राठोड घडणार नाही, याची काळजी आता सर्वांनी घेतली पाहिजे.न्यायालयीन चौकशी करा -कवाडेसभास्थळीच आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, विधानपरिषदेत मी आणि हरिभाऊ राठोड यांनी सीमा राठोड हत्या प्रकरण उचलले होते. कारवाई होईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. अद्याप साधे चार्जशीटसुद्धा दाखल झालेले नाही. या अन्याय- अत्याचार सहज घेतले जातात, असा आरोपही प्रा. कवाडे यांनी यावेळी केला. गरिबांच्या लेकीबाळी म्हणजे भाजीपाला आहे का? असा संतप्त सवाल त्यांनी विचारला.या मोर्चात ध्वनिक्षेपकावरून राजपालसिंग राठोड हे बंजारा भाषेतच सूचना देत होते. मागणीपत्रावर डॉ. कृष्णा राठोड, राजेंद्र प्रल्हाद राठोड, अनिल चव्हाण, गोरखनाथ राठोड, रमेश पवार, पी. एम. पवार, नीलेश चव्हाण, सुनील चव्हाण, शरयू राठोड, कलाबाई राठोड, (पान ५ वर)