शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

लग्नसराई येऊनही बँड मुकेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 07:28 IST

औरंगाबाद : या वर्षातील दुसरा लग्नहंगाम तोंडावर येऊन ठेपला आहे. मात्र, अजूनही वरात व बँड वाजविण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी ...

औरंगाबाद : या वर्षातील दुसरा लग्नहंगाम तोंडावर येऊन ठेपला आहे. मात्र, अजूनही वरात व बँड वाजविण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली नाही. मागील ७ महिन्यांपासून बँडचा सूर हरवला आहे. यामुळे जिल्ह्यातील ४५० बँडपथके व त्यातील सुमारे ७ हजार कलाकार बेरोजगार झाले आहेत.

याच महिन्याच्या २७ तारखेपासून लग्नसराईला सुरुवात होत आहे. मंगल कार्यालये बुक होऊ लागली आहेत; पण या लग्नाचा आनंद द्विगुणित करणाऱ्या बँडपथकांना मात्र बँड वाजविण्यास अजून परवानगी दिली नाही. यामुळे वरात निघणार की नाही, याबद्दल अजूनही अनिश्चितता कायम आहे. कोरोनामुळे ऐन एप्रिल, मे, जून या लग्नहंगामात लॉकडाऊन होते. याचा मोठा फटका मॅरेज इंडस्ट्रीला बसला. त्यात सर्वात अधिक हाल बँडपथकातील कलाकारांचे झाले . यामुळे बँडपथकाच्या कलाकारांमधून संताप व्यक्त केला जात आहे. बँडपथकात अशिक्षित कलाकारांची संख्या अधिक आहे. त्यातील अनेक जण भाजीपाला विकणे, माती काम करणे, हॉटेलवर काम करीत आहेत. औरंगाबाद शहर बँड संघटनेकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात ४५० लहान-मोठे बँडपथके आहेत. त्यातील ३२ प्रमुख बँडपथके शहरात आहेत. प्रत्येक बँडपथकात १० ते ३५ कलाकार असतात. सुमारे ७ हजार कलाकार आहेत. केवळ १५ बँडपथकेच नोंदणीकृत आहेत. लॉकडाऊनमुळे प्रत्येक बँडपथकाचे साधारणपणे दीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. जवळपास ९ कोटींचा फटका नुसता बँडपथकांना बसला आहे.

चौकट

सर्वत्र परवानगी, जिल्ह्यातच नाही

नागपूरपासून सर्वत्र वराती काढण्यास व बँड वाजविण्यास परवानगी दिली आहे. २० कलाकारांची मर्यादा घालून दिली आहे. बँडपथकाला परवानगी देण्यात यावी यासाठी आंदोलन केले; पण परिणाम झाला नाही.

अशोक मोरे

अध्यक्ष, औरंगाबाद शहर बँड असोसिएशन

--

उपासमारीची वेळ

बँड पथकाचे मालक व कलाकार यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. दिवाळीत आम्ही कलाकारांना ३ ते ४ हजार रुपये बोनस देत असतो. यंदा दैनंदिन खाण्याचे वांधे आहेत.

----

चौकट

२७ पासून लग्नसराई

नोव्हेंबर २७, ३०

डिसेंबर ७, ८, ९, १७, १९, २३, २४, २७

जानेवारी ३, ५, ६, ७, ८,९, १०

एप्रिल २२, २४, २५, २६, २८, २९, ३०

मे १,२,३,४,५,८,१३,२०,२१,२२,२४,२६,२८, ३०,३१

जून ४,६,१६,१९,२६,२७,२८

जुलै १,२,३,१३

-----

चौकट

एकूण बँड पथके- ४५०

कर्मचारी- ७०००

----

अधिकृत बँड पथके - १५

कर्मचारी- ३००

---

नुकसान

८ महिन्यांत ९ कोटींचा फटका