शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
4
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
5
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
6
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
7
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
8
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
9
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
10
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
11
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
12
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
13
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
14
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
15
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
16
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
17
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
18
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
19
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
20
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?

लातुरात बहुजन क्रांती मोर्चा

By admin | Updated: January 10, 2017 23:42 IST

लातूर : लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यांचा संयुक्त बहुजन क्रांती मोर्चा मंगळवारी दुपारी १२.५० वाजेच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला.

लातूर : लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यांचा संयुक्त बहुजन क्रांती मोर्चा मंगळवारी दुपारी १२.५० वाजेच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. या मोर्चात लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांतील विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांचा सहभाग होता. दुपारी ३.३० वाजता बहुजन क्रांती मोर्चाचा समारोप जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयावर झाला.लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यांतील बहुजन समाजाच्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी दुपारी १२.५० वाजण्याच्या सुमारास डॉ. आंबेडकर पार्क येथून या मोर्चाला सुरुवात झाली. अशोक हॉटेल, शिवाजी चौक आणि जुने जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात विविध मागण्यांचे फलक हाती घेतलेले कार्यकर्ते, महिला सहभागी झाल्या होत्या. मोर्चात कार्यकर्त्यांकडून हाती फलक घेऊन विविध घोषणा देण्यात आल्या. अ‍ॅट्रॉसिटी कायदा कडक करावा, अ‍ॅट्रॉसिटीसाठी स्वतंत्र न्यायालय आणि स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात यावी, जे लोक एससी, एसटीमधील लोकांचा गैरवापर करून अ‍ॅट्रॉसिटीचे खोटे गुन्हे दाखल करीत आहेत, अशांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत. भटके विमुक्त जाती-जमातीसाठी स्वतंत्र केंद्रीय अनुसूची करण्यात यावी, त्यांनाही अ‍ॅट्रॉसिटीच्या कायद्यानुसार संरक्षण देण्यात यावे, त्यांच्यासाठी जातीचे प्रमाणपत्र व पडताळणी प्रमाणपत्राच्या जाचक अटी रद्द करण्यात याव्यात, कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यात यावे, मराठा समाजालाही ओबीसीचे आरक्षण कायम ठेवून आरक्षण देण्यात यावे, महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कायदा कडक करण्यात यावा आदींसह विविध मागण्या या बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आल्या. मोर्चा दुपारी २.३० वाजता जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी मोर्चात विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपले विचार मांडले. मोर्चात लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांतील विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. मोर्चात विविध समाजाच्या विविध मागण्या करण्यात आल्या. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यास बहुजन क्रांती मोर्चाची हरकत नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. लिंगायत समाजालाही आरक्षण देण्यात यावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. (प्रतिनिधी)