शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
3
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
4
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
5
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
6
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
7
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...
8
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
9
एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
10
Swapna Shastra: पाण्याशी संबंधित कोणतेही स्वप्नं आगामी सुख दु:खाची देतात चाहूल; कशी ते पहा!
11
Operation Keller: सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार
12
घरची कामं करा अन् फिट राहा; केर काढा, लादी पुसा, कपडे धुवा... पाहा किती कॅलरी होतात बर्न?
13
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
14
Viral Video : प्रियकराचं लागत होतं लग्न, ऐन मुहूर्तावर झाली प्रेयसीची एंट्री; पुढं काय झालं बघाच!
15
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?
16
सर्वोच्च न्यायलयाने फेटाळला दिल्लीतील व्यावसायिकाचा जामीन अर्ज,ड्रग्ज आणि लष्कर-ए-तोयबाशी आहे कनेक्शन!
17
बारावी नापास डॉक्टर! रुग्णांच्या जीवाशी खेळ; क्लिनिक उघडून मोठे आजार बरे करण्याचा दावा
18
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...
19
डिफेन्समध्ये का आहे तेजी? घसरत्या बाजारातही HAL आणि BEL मध्ये खरेदीदारांची रांग; कारण आहे खास
20
'भूत बंगला'मध्ये अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार 'हा' अभिनेता, फोटो पोस्ट करत म्हणाला...

जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ‘बुरे दिन’

By admin | Updated: July 26, 2014 01:07 IST

कंधार/उमरी/धर्माबाद : जुलै महिना संपत आला आहे़ परंतु पावसाची हुलकावणी सतत चालू आहे़ काहींनी पेरणीचा जुगार खेळला असला तरी बजुतांशी शेतकऱ्यांच्या पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या आहेत़

कंधार/उमरी/धर्माबाद : जुलै महिना संपत आला आहे़ परंतु पावसाची हुलकावणी सतत चालू आहे़ काहींनी पेरणीचा जुगार खेळला असला तरी बजुतांशी शेतकऱ्यांच्या पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या आहेत़ १९७२ सारखी परिस्थिती शेतकऱ्यांवर ओढवली असून कोरड्या दुष्काळाची गडद छाया तालुक्यावर घोंघावत आहे़कंधार शिवार पिकांनी फुलले तर शेतकऱ्यांचे बळंद अन्नधान्यांनी भरते़ बाजारात मुबलक अन्नधान्य उपलब्ध होते़ नोकरदार मजुरदारांनाही जगण्याची अन्नधान्य अपेक्षेप्रमाणे मिळते़ जगाचा पोशिंदा अन्नासाठी संघर्ष करू लागला तर इतरांना त्याचा फटका असह्य होतो़ १९७२-७३ साली अन्नधान्य पिकले नसल्याने मिलो ज्वारीवर गुजराण करावी लागली़ रोजगार हमी योजनेवर सुगडी सोबत ज्वारीचे वाटप करून मानवाला मोठा आधार देण्याचा शासनाने प्रामाणिक प्रयत्न केला़ शेतकरी, शेतमजुरांना रोहयोसाठी मोठी आधारवड ठरली़गत ११ वर्षांत पावसाचा लपंडाव सतत चालू होता़ अपवादाने काही वर्षे पावसाने सरासरी ओलांडली़ परंतु सरासरी ओलांडली नसलेल्या वर्षात मूग-उडीदावर संक्रांत आली़ तरीही खरीप हंगामातील ज्वारी, कापूस, सोयाबीन, तूर पिकाचा उतारा घटला तरी धान्य कमी अधिक हाती आले़ २००३ साली जून ते आॅक्टोबरपर्यंत ८३९ मि़ मी़ पावसाची नोंद झाली़ २००४ साली ६४०, २००५ मध्ये ९४७, २००६ मध्ये ७८८, २००७ मध्ये ४५०, २००८ साली ५३५, २००९ साली ४४४, २०१० साली विक्रमी १०४६ ची नोंद झाली़ २०११ मध्ये ८०३, २०१२ मध्ये ५२७ आणि २०१३ साली ८४५ मि़मी़ पावसाची नोंद झाल्याची माहिती लिपिक एस़बी़ गीते यांनी दिली़गत काही वर्षात जून महिन्यात समाधान देणारी पावसाची हजेरी राहिली़ २००८ साली जून महिन्यात १६१ मि़मी़ पावसाची नोंद राहिली़ २००९ मध्ये ७६, २०१० साली ७४, २०१२ मध्ये ७९ आणि २०१३ साली विक्रमी १४६ मि़ मी़ नोंद झाली़ त्यामुळे जुलै महिन्यापर्यंत पेरण्या आटोपल्या़ २०१४ साली जून महिन्यात अवघा ४९़४८ मि़ मी़ पाऊस झाला़ २४ जुलैपर्यंत कंधार पर्जन्यमापक यंत्रावर ११ वेळा पावसाची नोंद झाली़ उस्माननगर ७ वेळा, फूलवळ ९, कुरूळा-४, आणि पेठवडज ३ वेळा नोंद झाली़ मात्र एकाही पावसाने पेरणीपुरती हजेरी लावली नाही़जुलै महिन्यातील पहिल्या आठवड्यात कापसाची लागवड १६०० हेक्टर, ५० हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली होती़ ६१ हजार ५०० हेक्टरचा खरीप हंगाम असताना तोकडी पेरणी झाली़ उपलब्ध जलसाठा शेतकरी कापसासाठी वापरतानाचे चित्र आहे़ परंतु निसर्ग पावसावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांची मात्र केविलवाणी स्थिती झाली आहे़ प्रचंढ ढगानी आकाश व्यापत आहे़ परंतु पाऊस मात्र हजेरी लावत नाही़कोरड्या दुष्काळाची छाया तालुक्यावर जाणवत असल्याने शेतकऱ्यांसह नागरिक भयभीत झाले आहेत़ वयोवृद्धाने यापूर्वीचा दुष्काळ अनुभवला आहे़ नव्या पिढीला पिण्याचा पाणीप्रनांचा फटका गत ४ वर्षापूर्वी स्मरणात राहणारा होता़ सध्या भयावह चित्र समोर आले आहे़ विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आदींनी दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे़ (वार्ताहर)नायगाव, उमरी, तालुक्यात पेरण्यात गेल्या वाया उमरी : आजवर पडलेल्या अत्यंत अल्प अशा पावसाचे प्रमाण पाहता दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाली असून नायगाव, उमरी व धर्माबाद या तिनही तालुक्यात तिसऱ्यांदा केलेली पेरणी वाया गेली़ नायगाव, उमरी, धर्माबाद तालुक्यात पावसाअभावी खरीपाच्या पेरण्या मोडीत निघाल्या आहेत़ त्यामुळे मतदारसंघातील शेतकऱ्यांचे बियाणे, खत व मजुरांवर झालेला खर्च असे करोडो रुपयांचे नुकसान झाले़ जून ते २४ जुलै २०१४ पर्यंत झालेल्या पावसाची तहसील कार्यालयाकडून मिळालेली माहिती सादर करण्यात आली ती पुढीलप्रमाणे- नायगाव तालुका - नायगाव सर्कल १४३ मि़मी़, नरसी ११४ मि़मी़, मांजरम ५८ मि़मी़, बरबडा ११० मि़मी़, कुंटूर १३७ मि़मी़, सरासरी प्रमाण ११२़४० मि़मी़ धर्माबाद तालुका - धर्माबाद शहर- १२४ मि़मी़, जारीकोट सर्कल ११५ मि़मी़, करखेली ११० मि़मी़, सरासरी ११६ मि़मी़ उमरी तालुका - उमरी शहर - ११६़४०, गोळेगाव सर्कल ९०़२०, सिंधी ११७ मि़मी़, सरासरी प्रमाण १०७़८३ मि़मी़ मागील वर्षाच्या तुलनेत आजवर तब्बल ८० ते ९० टक्के कमी पाऊस झाला़ सध्या या तिन्ही तालुक्यात कुठेच नदी नाल्यांना पाणी आले नाही़ विहिरी, बोअर आटले़ पिण्याचे पाणी, जनावरांसाठी पाणी, चारा याबाबत गंभीर स्थिती निर्माण झाली आहे़ अशा परिस्थितीत शासन यंत्रणेकडून उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे़ (वार्ताहर)जोरदार पावसाची प्रतीक्षाशंकरनगर : शंकरनगर परिसरासह नायगाव, बिलोली, मुखेड, देगलूर तालुक्यांत अद्याप जोरदार आणि भरपूर पाऊस झाला नाही. नद्या, नाले, तळे भरुन जनावरांच्या चाऱ्यांसह खरीप पिकांसाठी दमदार पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.मुखेड, बिलोली, देगलूर आदी तालुक्यांच्या काही गावांमध्ये ७ व ८ जुलैच्या रात्री साधारण पाऊस झाला. १३ व १४ जुलै रोजी देगलूर परिसरात पाच मिनिटे पाऊस झाला. २२ रोजी रिमझीम पाऊस झाला. देगलूर परिसरातील जवळपासच्या दहा-बारा खेडेगावात ७ व ८ जुलैच्या पावसानंतर काही शेतकऱ्यांनी पेरणी केली. १३ व १४ जुलैच्या रात्री पाऊस झाल्यामुळे शंकरनगर परिसरातील टाकळी, अटकळी, आदमपूर, केरुर, बिजूर, कामरसपल्ली, डोणगाव, धुप्पा, रामतीर्थ, किनाळा येथील शेतकऱ्यांनी बियाणाचे नुकसान झाले तरी चालेल. आथा थांबून चालणार नाही म्हणून पेरणी सुरु केली. पेरणी झालेल्या काही शेतात निंदणी आणि खुरपणी सुरु झाली आहे. असे असले तरी मोठ्या पावसाची सध्या गरज आहे. आठ-दहा दिवसांपासून आकाशात ढग येत आहेत. वारा ढगांना घेऊन जात आहे. (वार्ताहर)धर्माबाद तालुक्यात यंदा पाचपटीने कमी पाऊस धर्माबाद : तालुक्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाच पटीने पाऊस कमी झाला़ पन्नास टक्क्यापेक्षा अधिक शेतकऱ्यांना दुबार पेरणी केली आहे़ या दुबार पेरणीत शेतकऱ्यांना डबल खर्च लागला एवढेच सोयाबीन, उडीद, मूग पावसाअभावी नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे़धर्माबाद तालुक्यात जारीकोट, करखेली, आणि धर्माबाद या तीन महसूल विभागात पावसाची नोंद करण्यात आली असली तरीही कुठे पाऊस तर कुठे कोरडेफट वातावरण अशी स्थिती यंदा झाली आहे़ २०१३ मध्ये जुलै महिन्यापर्यंत ५०१ मि़ मी़ पाऊस पडला होता़ वर्षाअखेर एकूण ९७७ मि़ मी़ पाऊस झाला़ गेल्या वर्षीच्या तुलनेतय ंदा जुलै महिन्यापर्यंत केवळ ११६ मि़मी़ पाऊस पडला आहे़ म्हणजेच पाचपटीने पाऊस झालेला स्पष्ट दिसून येत आहे़ या कमी पावसामुळे शेतकरी चिंतेत आहेत़ पावसाळा सुरू होवून दोन महिने संपत आहे़ म्हणजेच अर्धाअधिक पावसाळा संपला तरी शेतकऱ्यांचे पीक जमिनीतच रवून बसले आहे़ एवढेच नसून शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली आहे़ ज्या शेतकऱ्याकडे बोअरची व्यवस्था असा शेतकऱ्यांनी नाजूक पिकांना वाचविण्यासाठी तुषार, ठिबक सिंचन अथवा तांब्याने पाणी टाकून पीक वाचविले आहे़ तालुक्यात एकूण ९० टक्के पेरणी झाल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी एच़व्ही़ सुरकुटवार यांनी दिली़ पावसाअभावी १० टक्के शेतकऱ्यांनी अद्याप पेरणी केली नाही़ सोयाबीन, उडीद, मूग पीक पावसाअभावी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे़ कापूस कसेबसे साधारण चांगले असले तरी पाऊस वेळेवर पडला नाही तर कापूसही नष्ट होईल़ परत दुबार, तिबार पेरणीनंतरही पाऊस मोठा पडत नसल्यामुळे शेतकरी आणखी संकटात सापडत आहे़ तालुक्यात दुहेरी पेरणीच्या कर्जामुळे एका शेतकऱ्याने आत्महत्या केली होती़ (वार्ताहर)