शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ध्येयवेडे बाबासाहेब शेळके सरकारी दरबारी दुर्लक्षित

By admin | Updated: September 3, 2014 01:09 IST

जालना : अंबड तालुक्यातील डोमेगाव येथील बाबासाहेब राधाकिसन शेळके यांनी सामाजिक बांधिलकीच्या नात्याने संपूर्ण डोमेगावात स्व:ताच्या खर्चातून दिड एकर जमीन विक्री करुन

जालना : अंबड तालुक्यातील डोमेगाव येथील बाबासाहेब राधाकिसन शेळके यांनी सामाजिक बांधिलकीच्या नात्याने संपूर्ण डोमेगावात स्व:ताच्या खर्चातून दिड एकर जमीन विक्री करुन १८० स्वच्छतागृह ेबांधून एक आदर्श निर्माण केला आहे.आपल्या गावात स्वच्छतागृह नसल्याने महिलांसह अबालवृध्दांची होणारी कुचंबना ग्रामपंचायतीत शिपाई म्हणून कार्यरत असलेले शेळके यांच्या लक्षात आली. तसेच गावातील स्वच्छतेचा प्रश्न स्वच्छतागृह उभारल्या शिवाय सुटू शकणार नाही, हे लक्षात आले. स्वच्छतागृह उभारणीसाठी शेळके यांनी जनजागृती सुरु केली. परंतु मना ऐवढा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळेच अखेर कुटुंबियांचा विरोध पत्कारून ३ एकर जमिनीपैकी दीड एकर जमीन विक्री करुन शेळके यांनी स्वच्छतागृह उभारणीचे काम सुुरु केले. शेळके यांनी २०१० साली संपूर्ण गावात १२०० झाडे लावली. ग्रामपंचायतीच्या २ एकर जागेवर वनराई तयार केली. स्वखर्चातून बोअर घेतला व वनराई उत्तमप्रकारे जगविली. स्वत:च्या खिशास झळ सोसून ते सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. स्वत:च्या खर्चातून वृक्षरोपण, संवर्धन,आणि संपूर्ण गाव त्यांनी हगणदारीमुक्त केले खरे, परंतु सरकारकडून त्यांच्या प्रयत्नांना फारसे सहकार्य मिळाले नाही. आपल्या गावाचा विकास करण्याची जे व्रत शेळके यांनी हाती घेतले ते आजपर्यत चालू आहे. मात्र प्रशासनाने याची दखल घेतली नाही ना कौतूक केले नाही. संपूर्ण गावात वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन आणि गावाला हगणदारीमुक्त करणारे बाबासाहेब शेळके यांच्या उल्लेखनीय कामाची दखल औरंगाबाद येथील राज्य समता सेवाभावी संस्थेने घेत शेळके यांना समतारत्न पुरस्कार जाहीर केला आहे.