केज : मांजरा धरणाला तडे या मथळ्याखाली बुधवारी ‘लोकमत’ मध्ये वृत्त प्रकाशित होताच लाभक्षेत्र विकास प्राधिकरण खडबडून जागे झाले. गुरुवारी धरणावर अधिकाऱ्यांची रीघ होती. अधीक्षक अभियंता एन.डी. कांबळे, कार्यकारी अभियंता आर.बी. करपे, शाखाधिकारी डी.एस. पाटील यांनी धरणाच्या भिंतीची पाहणी केली. भिंतीच्या दुरूस्तीसाठी लागणाऱ्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार केले आहे. दुरूस्तीबाबतचा प्रस्ताव वरिष्ठांकडून मंजूर करून घेऊ, असे कार्यकारी अभियंता आर.बी. करपे यांनी सांगितले. नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे. (वार्ताहर)
मांजरा धरणावर अधिकाऱ्यांची रीघ
By admin | Updated: June 20, 2014 00:44 IST