शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्हा परिषदेकडे सिंचन विहिरींच्या मागणीची नोंदच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 19:20 IST

पंचायत समितीस्तरावर सिंचन विहिरींच्या मागणीची आॅनलाईन नोंद अद्ययावत केली जात नाही. त्यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकरी सिंचन विहिरींच्या लाभापासून वंचित राहत आहेत.

ठळक मुद्देमराठवाड्यात केवळ औरंगाबाद जिल्ह्यामध्येच सर्वाधिक कमी सिंचन विहिरींचा लाभ मिळाला आहे. यासंदर्भात जिल्हाभरातून हजारो शेतकर्‍यांनी सिंचन विहिरींसाठी अर्ज केले आहेतपरंतु पंचायत समितीस्तरावर शेतकर्‍यांनी मागणी केलेल्या सिंचन विहिरींची आॅनलाईन मागणी अद्ययावत केली जात नाही.

औरंगाबाद : पंचायत समितीस्तरावर सिंचन विहिरींच्या मागणीची आॅनलाईन नोंद अद्ययावत केली जात नाही. त्यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकरी सिंचन विहिरींच्या लाभापासून वंचित राहत आहेत. आॅनलाईन मागणी नोंद न करणारा झारीतील शुक्राचार्य कोण आहे. त्याचा शोध घेऊन कारवाई करा, या शब्दात स्थायी समितीच्या बैठकीत आज गुरुवारी सदस्यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला सुनावले.

मराठवाड्यात केवळ औरंगाबाद जिल्ह्यामध्येच सर्वाधिक कमी सिंचन विहिरींचा लाभ मिळाला आहे. यासंदर्भात जिल्हाभरातून हजारो शेतकर्‍यांनी सिंचन विहिरींसाठी अर्ज केले आहेत; परंतु पंचायत समितीस्तरावर शेतकर्‍यांनी मागणी केलेल्या सिंचन विहिरींची आॅनलाईन मागणी अद्ययावत केली जात नाही. परिणामी सिंचन विहिरींसाठी शासनाकडून निधीच दिला जात नाही. मागील ७-८ वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. ही बाब प्रशासन म्हणून आपण गांभीर्याने घेणार आहात का नाही, असा प्रश्न सदस्य किशोर बलांडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांना केला. यावेळी बलांडे यांनी फुलंब्री तालुक्यातील ९२ शेतकर्‍यांनी सिंचन विहिरींसाठी अर्ज केले होते. त्यापैकी अवघ्या १५ शेतकर्‍यांची मागणी आॅनलाईन अद्ययावत झाल्याचा पुरावाच ‘सीईओ’ यांच्यासमोर ठेवला. तेव्हा ‘सीईओ’ आर्दड यांनी यासंदर्भात चौकशी समिती स्थापन करून त्या समितीमार्फत जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांमध्ये आॅनलाईन मागणी अद्ययावत का केली जात नाही, याची खातरजमा केली जाईल.  दोषी कर्मचार्‍यांवर तात्काळ कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. 

कर्तव्यदक्ष शिक्षणाधिकारीशिक्षकांची बिंदू नामावली सदोष आहे. सेवानिवृत्त, मृत्यू पावलेल्या शिक्षकांची नावे बिंदू नामावलीतून काढून टाकलेली नाहीत. राखीव जागांवर नियुुक्त शिक्षकांना खुल्या जागांवर दाखविण्यात आले आहे, अशी तक्रार काही शिक्षकांनी शासनाकडे केली होती. त्यानुसार शासनाने यासंदर्भात समिती नेमून बिंदू नामावलीची पुनर्तपासणी करण्याचे आदेश दिले होते. समितीने तपासणीमध्ये त्रुटी दूर करून खुल्या प्रवर्गातील ५९ शिक्षकांच्या जागा वाढविल्या. तथापि, शिक्षणाधिकारी एस. पी. जैस्वाल यांनी २७ फेब्रुवारी रोजी पदभार स्वीकारला. त्याच दिवशी जि. प. अध्यक्षा तसेच ‘सीईओं’नी बिंदू नामावलीचा प्रश्न निकाली काढण्याचे आदेश दिले. शिक्षणाधिकारी जैस्वाल यांनी आपल्या सहकार्‍यांसह कार्यालयात बसून रात्री १२ वाजेपर्यंत तपासणी केली व खुुल्या प्रवर्गातील तब्बल ६८ शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीने येण्याचा मार्ग मोकळा केला. याबद्दल त्यांचे सभागृहात अभिनंदन करण्यात आले.