शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

औरंगाबादेत महिला असुरक्षित

By admin | Updated: July 4, 2014 01:08 IST

अबोली कुलकर्णी/ अश्विनी मघाडे , औरंगाबाद शहरात महिला असुरक्षित आहेत. मागील दहा वर्षांत जे घडले नाही ते आज घडत आहे. महिलांना मुक्तपणा वाटत नाही, घराबाहेर पडल्यास त्यांना असुरक्षित वाटते.

अबोली कुलकर्णी/ अश्विनी मघाडे , औरंगाबादशहरात महिला असुरक्षित आहेत. मागील दहा वर्षांत जे घडले नाही ते आज घडत आहे. महिलांना मुक्तपणा वाटत नाही, घराबाहेर पडल्यास त्यांना असुरक्षित वाटते. महाविद्यालये, कार्यालये, वसतिगृहे, रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या छेडछाडीचे प्रमाण वाढल्यामुळे त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आली आहे. शहरातील ९९ टक्के महिला आज असुरक्षित असल्याचे लोकमतच्या सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे़शहरात तरुणींच्या छेडछाडीबद्दल वाढत जाणाऱ्या घटना पाहता त्यांच्या असुरक्षिततेबद्दल सर्वेक्षण करण्याची गरज जाणवली. कॉलेज, आॅफिसला जाणाऱ्या तरुणी आणि महिला यांना दररोज छेडछाडीच्या प्रसंगांना सामोरे जावे लागते. तरुणी दिसल्यावर कॉमेंट करणे, पाठलाग करणे, स्पर्श करण्याचा प्रयत्न करणे, फोनवरून धमकी देणे असे प्रकार घडतात. त्यामुळे तरुणी मानसिकरीत्या त्रस्त होतात. या घटनांचा त्यांच्या वैयक्तिक आणि शैक्षणिक आयुष्यावर दूरगामी परिणाम होतो. या घटना घडत असताना तक्रार करण्यासाठी असमर्थ आहोत, अशी भावना त्यांच्यामध्ये निर्माण होते. पोलिसांत तक्रार केल्यास इतर नागरिकांना माहीत होईल, या विचाराने त्या भयभीत होतात. महिला व तरुणी स्वत:ला असुरक्षित मानत असल्याचे सर्वेक्षणात आढळले.याची भीती वाटतेकॉलेज, आॅफिसला जाताना तरुणींना छेडछाडीच्या घटनांना सामोरे जावे लागते. त्यावेळी त्यांना रस्त्यावरून एकटे फिरणे, विचित्र नजरांचा त्रास, कॉमेंट करणे, विनाकारण मानसिक त्रास, ब्लॅकमेल करून गैरफायदा घेणे, रात्री एकट्याने बाहेर फिरण्याची, चुकीची माहिती देऊन वापर करणे, एकटेपणाची भीती, स्पर्श करण्याची भीती, कॉलेजला जाण्याची भीती, तक्रारीनंतर होणाऱ्या परिणामांची भीती, सोबतीची गरज या सर्व बाबींची भीती वाटते. घडणाऱ्या घटनांचा आपल्या कौटुंबिक आणि शैक्षणिक आयुष्यावर परिणाम होणार नाही ना, याची त्यांना काळजी वाटते.प्रतिकार करावा शहरात वास्तव्यास असलेल्या तरुणी, महिला यांच्या सुरक्षिततेबद्दल सर्वेक्षण के ले असता, असे निदर्शनास आले की, त्या असुरक्षित आहेत; मात्र आलेल्या प्रसंगांना घाबरून न जाता त्यांचा सक्षमपणे सामना करणे गरजेचे आहे.प्रसंगी आसपासच्या नागरिकांची किंवा पोलिसांची मदत घ्यावी. ज्यामुळे छेड काढणाऱ्या व्यक्तीला शासन होईल. आपल्यासमोर एखादा प्रसंग घडत असेल, तर त्याकडे कानाडोळा न करता, सतर्कपणे त्याला विरोध करावा. पोलीस तक्रार का करावी वाटत नाही?काही तरुणी व महिलांनी पोलिसांत तक्रार केली असता त्यांना वाईट अनुभव आला़ पोलिसांनी अनेक प्रकरणांत तक्रार करणाऱ्या महिलेलाच दोषी ठरवले़ तरुणींनी बऱ्याच वेळेस तक्रार करूनदेखील काहीच उपयोग झाला नाही़ उलट पोलिसांनी तरुणींवरच प्रश्नांचा भडिमार करून दोषींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला़ काही तरुणींचे म्हणणे आहे की, पोलिसांत तक्रार केल्यास बदनामीची भीती वाटते़तक्रार केली तर आणखी त्रास वाढेल, अशीही भीती तरुणींमध्ये आहे़ काही महिलांचे म्हणणे आहे की, पोलीसच त्रास देतात़ छेडछाडीविरुद्ध तक्रार करायला गेल्यास अनेकदा मुलींनाच दोषी धरले जाते, म्हणून ३४ टक्के तरुणी व महिलांना पोलिसांत तक्रार करून काहीच उपयोग होत नाही, असे वाटते़