शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादची ओळख आता औद्योगिकनगरी अशीही

By admin | Updated: August 10, 2014 02:04 IST

औरंगाबादची ओळख आता औद्योगिकनगरी म्हणूनही दृढ होते आहे,

औरंगाबाद : डीएमआयसीमुळे सर्वांनाच दृष्टिकोन बदलावा लागला. त्यामुळेच ऐतिहासिक औरंगाबादची ओळख आता औद्योगिकनगरी म्हणूनही दृढ होते आहे, असे प्रतिपादन राज्याचे उद्योग राज्यमंत्री सचिन अहिर यांनी शनिवारी (दि. ९) येथे आयोजित कार्यक्रमात केले. ‘डीएमआयसी : औरंगाबादचा बदलता चेहरा’ या कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, हा प्रकल्प एवढा मोठा आहे की, प्रारंभी प्रत्येकालाच तो प्रत्यक्षात येण्याविषयी शंका होती. परंतु आम्ही अंमलबजावणी केली व चित्र बदलले. डीएमआयसीची सर्वच प्रक्रिया आमच्यासाठी ‘लर्निंग प्रोसेस’ होती. या प्रकल्पावर काम करताना आम्हा सर्वांनाच आपला दृष्टिकोन बदलावा लागला.जुन्या भूसंपादन कायद्यानुसार एवढे मोठे भूसंपादन शक्य नव्हते. त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांच्या जमिनीला बाजारभाव दिला. बिडकीनच्या शेतकऱ्यांना तर २३ लाख रुपये एकरी भाव दिला. त्यामुळे आता अनेक शेतकरी आमच्याकडे येऊन पुढील संपादन केव्हा करणार, अशी विचारणा करीत आहेत. एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांना जी १५ टक्के जागा परत द्यायची आहे, ती मूलभूत सोयी- सुविधा विकसित करूनच द्यावी, असाही निर्णय घेतला. डीएमआयसीमुळे या भागात रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होतील. पर्यावरणपूरक औद्योगिक शहर येथे उभे राहील. मराठवाड्यात आकाराला आलेले आॅटो क्लस्टर, जालन्यातील स्टील क्लस्टर हे येथील उद्योजक व कामगारांची बदललेली मानसिकता दर्शविते, असे सांगून अहिर म्हणाले, महाराष्ट्रात आता उद्योग उभारणीसाठी चाकणनंतर दुसरी पसंती औरंगाबादला मिळते आहे. या शहराची ओळख आता औद्योगिकनगरी म्हणून होते आहे.