शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
3
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
4
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
5
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
6
Latest Marathi News LIVE: कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नोएडामधील सेक्टर क्र. ५९, ६० आणि ६२ मधील कारखान्यातील काम ठप्प
7
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
8
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
9
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
10
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
11
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
12
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
13
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
14
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
15
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
16
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
17
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
18
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
19
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
20
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद-नगर रेल्वेमार्गामुळे शेती, उद्योगाला मिळेल चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:02 IST

जयेश निरपळ गंगापूर : केंद्र सरकारने २०१८ च्या अर्थसंकल्पात सर्वेक्षणास मंजुरी दिलेल्या औरंगाबाद-अहमदनगर रेल्वेमार्गाचे प्रत्यक्ष सर्वेक्षण २ ते ६ ...

जयेश निरपळ

गंगापूर : केंद्र सरकारने २०१८ च्या अर्थसंकल्पात सर्वेक्षणास मंजुरी दिलेल्या औरंगाबाद-अहमदनगर रेल्वेमार्गाचे प्रत्यक्ष सर्वेक्षण २ ते ६ मार्च दरम्यान होणार आहे. या मार्गात गंगापूरचा समावेश असून, तालुक्यातील शेतकरी, उद्योजक व व्यापाऱ्यांना हा मार्ग प्रत्यक्षात सुरू झाल्यास मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. या मार्गाच्या सर्वेक्षणासाठी सर्व स्तरातून पाठपुरावा केला जात होता.

प्रस्तावित रेल्वेमार्गावर फक्त औरंगाबादवरून पुणेला जाणाऱ्या प्रवाशांनाच फायदा होणार नाही, तर या मार्गावरील आधुनिक शेती, उद्योगांना याचा मोठा फायदा होईल. आजघडीला दळणवळणाच्या अपुऱ्या सोयी व खर्चिक साधनांमुळे शेतीमाल काही मर्यादेपर्यंत राहिला आहे. औरंगाबाद-अहमदनगर हा रेल्वेमार्ग प्रत्यक्षात सुरू झाल्यास शेतीमालाला परराज्यांतील मोठ्या बाजारपेठांचा पर्याय अगदी कमी खर्चात उपलब्ध होईल.

वाळूज परिसरातील उद्योगधंद्यांना देखील याचा थेट फायदा होणार आहे. त्यामुळे औद्योगिक मालवाहतूक बंगलोर, कोलकाता यासारख्या शहरांतून करणे जलद होईल. स्थानिक व्यापाऱ्यांची देखील व्यापारी शहरांंशी कनेक्टिव्हिटी वाढून मोठ्या प्रमाणात वेळ व पैसा वाचणार आहे. हा रेल्वेमार्ग प्रत्यक्षात सुरू झाल्यास मध्य रेल्वेमार्फत तालुका थेट दक्षिण व पूर्व रेल्वेस जोडणे सहज शक्य होईल.

शेतकरी, उद्योजक व व्यापाऱ्यांना आपल्या मालाची मालवाहतूक करणे सोयीस्कर होणार आहे. रेल्वेला मुख्य उत्पन्न हे मालवाहतुकीतूनच मिळत असल्याने भारतीय रेल्वेला देखील याचा फायदा होईल. या मार्गामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती देखील होईल. त्यामुळे हे सर्वेक्षण करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

------------------

आमच्या डाळींब, कांदा व पपईला परराज्यांत मोठी मागणी आहे; परंतु इतर वाहनाने ते पाठविणे परवडत नाही. हा रेल्वेमार्ग सुरू झाल्यास शेतकऱ्यांना परराज्यांत मोठ्या प्रमाणात सामूहिक माल पाठविता येईल. - डॉ. उद्धवराजे काळे पाटील, उद्योजक तथा शेतकरी

स्थानिक बाजारपेठेतून जादा दराने खरेदी करावे लागणारे पॅलेट इंधन हा रेल्वेमार्ग सुरू झाल्यास आम्हाला परराज्यांतून स्वस्तात व थेट आयात करणे सोईस्कर होईल. - विशाल गायकवाड, उद्योजक.

इतर शहरांतून माल वाहतूक करताना मालाची खूप चढ-उतार होते. यामध्ये नुकसान तर होतेच, शिवाय वेळ व पैसा जास्त जातो. या मार्गामुळे आम्हाला हे सर्व नुकसान टाळता येईल. - प्रवीण पारख, व्यापारी.