वर्ग - पटसंख्या -उपस्थिती
आठवी -१६,९१८-५,७२७
नववी -१६,२६६-४,६३६
दहावी -१७,२९४-५,३५७
अकरावी -१६,४३-४३९
बारावी -१२,१६१-२,३५०
--
संध्याकाळपर्यंत ४८८ शाळांनी भरली माहिती
शाळांना पाठविलेल्या लिंकमध्ये माहिती भरलेल्या ४८८ शाळांनी माहिती भरली. त्यात आठवी ते बारावी वर्गासाठी २६७६ शिक्षक आहेत. त्यापैकी २२८८ शिक्षक उपस्थिती होते. १८२६ शिक्षकांच्या आरटीपीसीआर तपासणी केली. त्यापैकी पाच शिक्षक बाधित आढळून आले. १३३२ शिक्षकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस, तर १८५० शिक्षकांनी दुसरा डोस घेतला आहे. अर्धे विद्यार्थी पहिला दिवस अर्धे विद्यार्थी दुसऱ्या दिवशी असे नियोजन आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी आलेली उपस्थिती सुमारे ४५ टक्क्यांपर्यंत आहे. ६४ हजार २८२ पैकी १८ हजार ५०९ विद्यार्थी पहिल्या दिवशी उपस्थित होते. एकूण पटावरील संख्येच्या तुलनेत हे प्रमाण २९ टक्के आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी डाॅ. बी. बी. चव्हाण यांनी दिली.