जालना : पैशासाठी पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाड मारून तीस जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीला सात वर्षांची सक्त मजूरी व पाच हजार रूपये दंडाची शिक्षा गुरूवारी जिल्हा व सत्र न्यायाधिश एस.एस. कोसमकर यांनी सुनावली आहे.अंबड तालुक्यातील नांदी येथील मनजीत बाबूराव पांजगे यांनी १६ सप्टेंबर २०१३ रोजी पत्नी सविता हिला माहेराहून मोटार सायकल घेण्यासाठी पन्नास हजार रूपये आणावेत म्हणून तिचा छळ केला होता. तसेच तिला जीवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात कुऱ्हाड घालून गंभीर जखमी केले होते. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात १८ सप्टेंबर २०१३ रोजी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सरकार पक्षातर्फे एकूण १४ साक्षीदार तपासण्यात आले. पैकी फिर्यादी साहेबराव म्हस्के त्यांची मुलगी सविता व इतर साक्षीदार तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवदास मिरकड, तपासीक अंमलदार सहाय्यक पोलिस निरीक्षक जे.एल.तेली यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या.दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपी मनजीत बाबूराप पांजगे यास सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा व दंड न भरल्यास आणखी पाच महिने साध्या कारवासाची शिक्षा सुनावली.सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता दीपक नारायण कोल्हे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)
पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न; पतीस सात वर्षांची सक्तमजुरी
By admin | Updated: August 21, 2015 00:38 IST