शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

अल्पवयीन मुलीला धमकी देऊन अत्याचार

By admin | Updated: June 27, 2016 01:03 IST

औरंगाबाद : ओळखीच्याच तरुणाने १७ वर्षीय युवतीला बदनामी करण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी त्या नराधमाविरोधात जवाहरनगर पोलीस ठाण्यात रविवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला.

औरंगाबाद : ओळखीच्याच तरुणाने १७ वर्षीय युवतीला बदनामी करण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी त्या नराधमाविरोधात जवाहरनगर पोलीस ठाण्यात रविवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस त्याच्या शोधात आहेत.योगेश डोळस (रा. शिवाजीनगर) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की, १७ वर्षीय पीडिता ही शहरातील एका औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेत आहे. शिवाजीनगर परिसरात आईसोबत ती राहते. तिची आई कामानिमित्त २२ जून रोजी मुंबईला गेली होती. त्यामुळे तीन दिवसापासून पीडिता घरी एकटीच होती. योगेश हा पीडिता आणि तिच्या आईच्या ओळखीचा आहे. मुलीची आई गावाला गेलेली असल्याची माहिती योगेशला समजली. रविवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास मुलगी घरी एकटी झोपलेली असताना योगेशने तिच्या घराचे दार वाजवले. एवढ्या रात्री कोण आले म्हणून मुलीने विचारले असता योगेशने स्वत:चे नाव सांगितले आणि तिच्याशी महत्त्वाचे बोलण्यासाठी आल्याचे सांगितले. ओळखीचाच असल्याने पीडितेने दरवाजा उघडला. योगेश घरात घुसला आणि त्याने आतून दरवाजा बंद करून घेतला. त्याने रडायला सुरुवात केली व आरडाओरड केल्यास तुझीच बदनामी होईल, शिवाय मीही तुझी बदनामी करेल, अशी धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. पहाटे पाच वाजेच्या सुमारास पीडितेची आई मुंबईहून घरी परतली. त्यावेळी तिने दरवाजा उघडण्यासाठी आवाज देताच योगेश घरातून बाहेर पडताना दिसला. मुलीच्या आईने त्याचा हात पकडला असता हाताला झटका देऊन तो पळून गेला. योगेशने बदनामी करण्याची धमकी देत आपल्यावर अत्याचार केल्याचे पीडितेने तिच्या आईला सांगितले.तिच्या मातेने पीडितेला सोबत घेऊन जवाहरनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर, महिला फौजदार मनीषा लाड तपास करीत आहेत. पोलिसांनी योगेशचा शोध सुरू केला आहे.