औरंगाबाद : एटीएममध्ये रक्कम भरण्यासाठी दिलेल्या तब्बल १२ लाख ५३ हजार १०० रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी सेक्युरिटी कंपनीच्या तीन जणांविरोधात सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.अर्जुन वराडे, अमोल आखाडे, सूरज अंभोरे, अशी आरोपींची नावे आहेत. पोलीस निरीक्षक कैलास प्रजापती यांनी सांगितले की, अर्जुन वराडे हे अॅक्टिव्ह सिक्युअर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक तर अन्य दोघे आरोपी त्यांचे कर्मचारी आहेत. तक्रारदार सुशील धुळे हे बँक प्रतिनिधी आहेत. सिडको भागातील एटीएम सेंटरमध्ये रक्कम जमा करण्याचे कंत्राट २०१३ मध्ये वराडे यांच्या कं पनीकडे होते. बँकेने काही महिन्यांपूर्वी त्यांचे कंत्राट रद्द केले. त्यानंतर त्यांना हिशेब करण्यासाठी कार्यालयात बोलावले होते. मात्र, वराडे आणि त्यांचे सहकारी तक्रारदार यांच्या कार्यालयात गेले नाही. यामुळे तक्रारदार यांनी एटीएममध्ये आरोपींनी भरलेल्या पैशाचा हिशेब तपासला असता मोठी गडबड झाल्याचे समोर आले. आरोपींनी १२ लाख ५३ हजार १०० रुपयांचा अपहार केल्याचे त्यांना समजले. त्यांनी सिडको ठाण्यात आरोपींविरोधात फिर्याद नोंदविली.
एटीएमचे साडेबारा लाख रुपये लंपास
By admin | Updated: November 7, 2016 01:09 IST