शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

मयूरपार्क परिसरातील ‘एटीएम’ फोडले

By admin | Updated: June 14, 2014 01:20 IST

औरंगाबाद : घरफोडी, लुटमारीसारख्या बेभरवशाच्या चोरीपेक्षा शहरातील बेवारस ‘एटीएम’ फोडायचे आणि मोठे घबाड पळविण्याकडे चोरट्यांचा कल वाढलेला आहे.

औरंगाबाद : घरफोडी, लुटमारीसारख्या बेभरवशाच्या चोरीपेक्षा शहरातील बेवारस ‘एटीएम’ फोडायचे आणि मोठे घबाड पळविण्याकडे चोरट्यांचा कल वाढलेला आहे. असाच प्रकार मयूरपार्क परिसरातील मारोतीनगरमध्ये शुक्रवारी पहाटे घडला; मात्र शेजारच्या नागरिकांमुळे थोडक्यात ‘एटीएम’ची लूट टळली. दरम्यान, एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याने चोरट्याचे सारे कारणामे टिपले आहेत. ‘एटीएम’ कक्षात त्याने कधी प्रवेश केला. आत गेल्यावर त्याने टिकासाच्या साह्याने एटीएम कसे फोडले, हे फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून सिडको ठाण्याचे निरीक्षक राजकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गोरख चव्हाण व कर्मचाऱ्यांनी पहाटेपासून दिवसभर मयूरपार्क व आजूबाजूच्या परिसरात कोम्बिंग आॅपरेशन राबविले.औरंगाबाद : त्यात मागच्या दोन-तीन महिन्यांपूर्वी आंबेडकरनगर चौकातील ‘एटीएम’ फोडणाऱ्या तीन गुन्हेगारांना संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. असे असले तरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला एटीएम फोडणारा मुख्य चोरटा मात्र पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी झाला. आवाजाने एकजण जागा झाला‘एटीएम’च्या खालच्या बाजूमध्ये पैसे असतात म्हणून चोरट्याने तेथे टिकासाचा जोरात प्रहार केला. त्या आवाजाने बाजूच्या अर्पाटमेंटमध्ये बाहेर झोपलेले देशपांडे नावाचे जागरूक नागरिक जागे झाले. त्यांनी ‘कोण आहे रे’ असे म्हणत आवाज दिला व मुलाला सोबत घेऊन ते एटीएमच्या दिशेने धावले. त्यांना पाहून चोरट्याने हातात टिकास घेऊन तेथून पळ काढला. देशपांडे यांनी तात्काळ सिडको ठाण्याला फोन करून घडलेली घटना पोलिसांना कळवली. नेमके त्यावेळी जवळच्याच वसाहतीत पोलीस गस्तीवर होते. ते अवघ्या १० मिनिटांत तेथे पोहोचले. यापूर्वी पिसादेवी रोडवरील आंबेडकरनगरमध्ये ‘एटीएम’ फोडताना रंगेहाथ अटक केलेल्या तीन चोरट्यांना पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. लवकरच फरार चोरट्याला अटक करू, असा विश्वास उपनिरीक्षक गोरख चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. चौकट...बेवारस ‘एटीएम’ची संख्या मोठीशहरात राष्ट्रीयीकृत व अन्य बँकांचे मिळून १५० एटीएम आहेत. प्रत्येक एटीएमच्या ठिकाणी सुरक्षा कर्मचारी नेमावा, तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशा लेखी सूचना पोलिसांनी बँकांना दिल्या आहेत; पण शहरातील अनेक ‘एटीएम’ बेवारस आहेत. आतापर्यंत ‘एटीएम’ फोडण्याच्या ५ ते ६ घटना घडल्या आहेत. त्यापैकी सिडको ठाण्याच्या हद्दीत ३ घटना घडल्या आहेत. एका ‘एटीएम’मध्ये किमान १५ लाख रुपयांच्या नोटा असतात. एटीएमच्या माध्यमातून एवढी मोठी रक्कम बँका कोणाच्या भरवशावर ठेवतात, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.कशी घडली घटनामयूरपार्क येथील मारुतीनगरमध्ये हनुमानमंदिराजवळ भारतीय स्टेट बँकेचे एटीएम आहे. साधारणपणे २१-२२ वर्षे वयोगटातील एक तरुण पहाटे ४.२२ वाजेच्या सुमारास हातात टिकास घेऊन ‘एटीएम’मध्ये गेला. जाताना त्याने अंगातील टीशर्ट डोक्यावर घेऊन तोंड लपविण्याचा प्रयत्न केला. कदाचित त्याला आतमध्ये ‘सीसीटीव्ही’ कॅमेरा असेल व तो आपला फोटो टिपेल, अशी त्याला भीती वाटली असावी. आत गेल्यानंतर ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्याकडे दुर्लक्ष करीत त्याने गडबडीत टिकासाच्या साह्याने ‘एटीएम’ फोडले.