शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

सहायक परिवहन अधिकारी जायभाये लाचेच्या जाळ्यात

By admin | Updated: January 22, 2016 00:13 IST

औरंगाबाद : स्कूल बसच्या परवान्यासाठी सात हजाराची लाच मागणाऱ्या सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी (एआरटीओ) सुधीर जायभाये (४२, रा. प्लॉट क्र.३९, महाराणा प्रताप हौसिंग सोसायटी, एन-७) यांना

औरंगाबाद : स्कूल बसच्या परवान्यासाठी सात हजाराची लाच मागणाऱ्या सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी (एआरटीओ) सुधीर जायभाये (४२, रा. प्लॉट क्र.३९, महाराणा प्रताप हौसिंग सोसायटी, एन-७) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (दि.२१) अटक केली. जायभाये यांच्या वतीने लाच स्वीकारणारा एजंट उपेंद्र ऊर्फ बाबू रॉय (३३, रा, गरमपाणी) यालाही जेरबंद करण्यात आले.तक्रारदाराच्या पाच बसेस एका शाळेतील विद्यार्थी वाहतूक करतात. वाहतूक परवाना नसणाऱ्या या बसेसचा स्कूल बसमध्ये समावेश करण्याची त्यांची मागणी होती, तसेच शाळेच्या मालकीच्या सात बसेसच्या परवान्यांचेही नूतनीकरण करायचे होते. तक्रारदाराने या कामांची कागदपत्रे तयार केली. १८ जानेवारी रोजी जायभाये यांची कार्यालयात भेट घेऊन आपली कामे करण्याची गळ घातली. या कामांसाठीचे ११,३५० रुपयांच्या शासकीय शुल्काचा भरणा करण्याचे जायभाये यांनी सांगितले. त्यानुसार तक्रारदाराने शासकीय शुल्काचा भरणा केला. त्यानंतर पुन्हा जायभाये यांची भेट घेतली असता, वरील कामे करून देण्यासाठी दहा हजाराच्या लाचेची मागणी त्यांनी केली. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नव्हती. त्याने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार गुरुवारी ‘आरटीओ’ कार्यालयात सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून सात हजार रुपयाची लाच घेताच उपेंद्रला जेरबंद करण्यात आले. त्यानंतर जायभाये यांना अटक करण्यात आली.