औरंगाबाद : वडिलोपार्जित मालमत्तेच्या वाटणीवरून एका तरुणाने आपल्या आत्यावर चाकूने हल्ला करून तिला गंभीर जखमी केले. ही घटना शनिवारी चेलीपुरा चौकात घडली.हल्ला करणारा आरोपी आंतेश राधेश्याम शेजूळ (१९, रा. हिनानगर, चिकलठाणा) असे आरोपीचे नाव असून, त्याला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेबाबत माहिती देताना सिटीचौकचे सहायक निरीक्षक शाहेद सिद्दीकी यांनी सांगितले की, आंतेशच्या वडिलोपार्जित मालमत्तेच्या नुकत्याच वाटण्या करण्यात आल्या. या वाटण्यामध्ये काचीवाडा येथे राहणारी त्याची आत्या रंजनाबाई अशोक आव्हाड (४०) यांनी दुजाभाव केला. आत्यामुळेच आपल्या हिश्श्याला कमी मालमत्ता आली, असे आंतेशचे म्हणणे होते. हा राग मनात धरून काल त्याने आत्याला चेलीपुरा चौकात गाठले आणि शिवीगाळ सुरू केली. त्यातून त्यांच्यात वाद झाला. तेव्हा आंतेशने सोबत आणलेल्या चाकूने आत्यावर सपासप वार केले. त्यात रंजनाबाई गंभीर जखमी झाल्या. या घटनेबाबत सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
तरुणाचा आत्यावर प्राणघातक हल्ला
By admin | Updated: August 4, 2014 01:56 IST