शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
2
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
3
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
4
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
5
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
6
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य
7
गुडन्यूज! परिणीती चोप्रा होणार आई, लग्नाच्या दोन वर्षांनंतर कुणीतरी येणार येणार गं...
8
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
9
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
10
चौथ्या स्टेजच्या कर्करोगाशी झुंजतेय अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी, तिला सतावतेय ९ वर्षांच्या मुलीची चिंता
11
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
12
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
13
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
14
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
15
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण
16
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
17
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
18
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
19
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
20
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास

आवंढे, दाटलेले कंठ अन् धीरगंभीर सभागृह

By admin | Updated: June 8, 2014 01:15 IST

औरंगाबाद : ‘सुन्न आम्ही, क्षुब्ध आम्ही, स्तब्ध आम्ही, फक्त प्रेरणा तुम्ही...’ अशीच काहीशी भावना त्या धीरगंभीर सभागृहाची झाली होती

औरंगाबाद : ‘सुन्न आम्ही, क्षुब्ध आम्ही, स्तब्ध आम्ही, फक्त प्रेरणा तुम्ही...’अशीच काहीशी भावना त्या धीरगंभीर सभागृहाची झाली होती. आवंढे गिळत वक्ता एखादी आठवण सांगत होता. स्तब्ध व तेवढ्याच धीरगंभीर सभागृहातून उसासे बाहेर पडत होते. कुणाचा कंठ दाटून येत होता, तर गहिवरल्या मनाने कुणी ओघळणारे अश्रू रोखण्याचा अयशस्वी प्रयत्न करीत होता. तरीही साहेबांचे मोठेपण, कर्तेपण, जाणतेपण सांगत होते. तब्बल तीन तास सभागृह निश्चल होते. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या कार्यधुरंधरतेच्या आठवणीत प्रत्येक जण लीन झाला होता.केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांना शनिवारी सायंकाळी सिडको नाट्यमंदिरात सर्वपक्षीय, सामाजिक संस्था, संघटना, व्यापारी, उद्योजकांसह शहरवासीयांतर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली. श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक, कार्यकर्ते, महिला आल्या होत्या. मंचावर गोपीनाथ मुंडे यांची हसरी तसबीर पाहून अनेकांचा ऊर दाटून येत होता. गॉडफादर गेलेते माझे कधी मोठे भाऊ होते, तर कधी मला बेटा म्हणत. शिवसेना पक्षाबाहेरील ते माझे गॉडफादर होते, आधारस्तंभ होते, अशी भावुक श्रद्धांजली खा. चंद्रकांत खैरे यांनी अर्पण केली.औरंगाबादेत भव्य स्मारक उभारामराठवाड्याची अहोरात्र सेवा करणारे, मराठवाड्याच्या औद्योगिक विकासासाठी झटणारे गोपीनाथ मुंडे यांचे शहरात भव्य स्मारक उभे करावे. त्यातूनच आम्हाला सतत प्रेरणा मिळत जाईल, अशी सूचना खा. राजकुमार धूत यांनी श्रद्धांजली वाहताना केली. महापौर कला ओझा, उद्योगपती राम भोगले, आ. दिवाकर रावते, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर, आ. पाशा पटेल, आ. डॉ. कल्याण काळे, आ. संजय शिरसाट, माजी मंत्री हरिभाऊ बागडे, बाबूराव कदम, अनिल भालेराव, बारगजे, माजी खा. जयसिंगराव गायकवाड, माजी आ. विनायक मेटे, अ‍ॅड. सतीश तळेकर, सुभाष पाटील, डॉ. पी.एम. दरक, सुभाष लोमटे, मौलाना हाफीज, मधुकरअण्णा मुळे, माजी मंत्री अशोक पाटील डोणगावकर, ह.भ.प. नवनाथ आंधळे महाराज, शिरीष बोराळकर, उल्हास उढाण, विवेक देशपांडे आदींनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. महावीर पाटणी यांनी प्रास्ताविक केले. माजी आ. श्रीकांत जोशी यांनी सूत्रसंचालन केले. आ. प्रदीप जैस्वाल, आ. सतीश चव्हाण, माजी खा. मोरेश्वर सावे, संजय जोशी, ज्ञानोबा मुंढे, संजय केणेकर, राजू शिंदे आदींची यावेळी उपस्थिती होती.सीआयडी चौकशी व पंकजाकृपया भाजपाच्या नेत्यांवर संशय घेऊ नका, असे आवाहन खा. खैरे यांनी त्यांच्या मनोगतातून व्यक्त करताच, आतापर्यंत अडीच तास शांत, शोकाकुल असलेल्या सभागृहातून ‘सीआयडी चौकशी झालीच पाहिजे’च्या जोरदार घोषणा दणाणल्या. मनोगत संपता संपता खैरे यांनी ‘आता पक्षाने पंकजाला सांभाळावे’ असे आवाहन करताच, उपस्थितांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. देवेंद्र फडणवीस श्रद्धांजली वाहण्यासाठी उभे राहताच, पुन्हा सीआयडी चौकशीची मागणी झाली व पंकजाचे काय करणार, असेही त्यांना विचारण्यात आले.