शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

औरंगाबादेतील २ हजार होर्डिंग काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 00:09 IST

महापालिका आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारपासून शहरात अवैध होर्डिंग हटविण्याची महास्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली. १० तास चाललेल्या या मोहिमेत ९ वेगवेगळ्या पथकांच्या १६५ पेक्षा अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी २ हजार ७८ लहान मोठे होर्डिंग काढले.

ठळक मुद्देशंभर टक्के काम न झाल्यास निलंबन; आयुक्तांची तंबी

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिका आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारपासून शहरात अवैध होर्डिंग हटविण्याची महास्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली. १० तास चाललेल्या या मोहिमेत ९ वेगवेगळ्या पथकांच्या १६५ पेक्षा अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी २ हजार ७८ लहान मोठे होर्डिंग काढले. शहरातील प्रमुख चौकांमध्ये चमकोगिरी करणाºया भाऊ, दादांना या मोहिमेमुळे चाप बसला आहे. रविवारी सुट्टीच्या दिवशीही शहर स्वच्छतेची मोहीम सुरू राहणार आहे. ३१ जुलैपूर्वी शंभर टक्के होर्डिंग न काढणाºया वॉर्ड अधिकाºयांवर निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचे मनपा आयुक्तांनी घोषित केले.पर्यटनाची राजधानी असलेल्या ऐतिहासिक औरंगाबाद शहरात महापालिकेचा अजिबात धाक नसल्याने आजपर्यंत कोणाच्या मनात आल्यावर रस्त्यावर पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग लावण्यात येत असत. महापालिका एकाही अनधिकृत होर्डिंगवर राजकीय दबावापोटी कारवाई करीत नसल्याची परिस्थिती आहे. शहर विद्रुपीकरणाची दखल खंडपीठाने घेतली. खंडपीठाच्या आदेशानुसार संपूर्ण शहर स्वच्छ करण्याचा निर्णय महापालिका, पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने घेतला. शनिवारी सकाळी ७ वाजेपासून संपूर्ण शहरात नऊ वेगवेगळ्या पथकांमार्फत कारवाईला सुरुवात करण्यात आली. एका पथकात १७ ते १८ अधिकारी व कर्मचाºयांचा समावेश करण्यात आला. प्रत्येक पथकात संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, कर्मचारी तैनात करण्यात आले होते. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी शहरातील मुख्य रस्त्यांवरील लहान-मोठे अनधिकृत होर्डिंग काढण्यात आले. दिवसभरात २ हजार ७५ लहान मोठे होर्डिंग काढण्यात आले. पोलीस आणि मनपा यांच्या संयुक्त कारवाईमुळे प्रखर विरोध कुठेच झाला नाही. चार ते पाच ठिकाणी कारवाईनंतर नागरिकांनी विरोध दर्शविला. खंडपीठाच्या आदेशानुसार कारवाई सुरू असल्याचे सांगितल्यावर नागरिकांनी शांत राहणे पसंत केले. रात्री उशिरा मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी सर्व वॉर्ड अधिकाºयांना बोलावून आढावा घेतला. ३१ जुलैपूर्वी प्रत्येक वॉर्ड अधिकाºयाने शंभर टक्के होर्डिंग न काढल्यास निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.खाजगी जागेवरही जाहिरीतीसाठी परवानगी आवश्यकशहरात खाजगी जागेवर, इमारतींवर नागरिकांनी मोठमोठे होर्डिंग लावले आहेत. शनिवारी मनपाने कारवाईचा बडगा उगारताच मौलाना आझाद महाविद्यालयासमोर विरोध झाला. खाजगी जागेवरही जाहिरात फलक लावण्यासाठी मनपाची परवानगी आवश्यक असल्याचे सांगितल्यानंतर व्यापारी शांत झाले. जाधववाडी टी पॉइंट, आंबेडकरनगर, बीड बायपास रोडवर पटेल लॉन्स येथे कारवाईला विरोध झाला. महापालिका अधिनियम १९४९, मालमत्ता विद्रुपीकरण कायदा १९९५ नुसार खाजगी जागेवरही जाहिरात फलक लावायचा असेल तर मनपाची परवानगी घेणे बंधनकारक असल्याचे उपायुक्त मंजूषा मुथा यांनी सांगितले.नागरिक, व्यापारी, कार्यकर्त्यांचा रोषमहापालिकेच्या सर्वच पथकांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला अनधिकृत होर्डिंग दिसताच काढण्याची कारवाई करीत होते. खाजगी जागेवरील असंख्य फलक काढण्यात आले. त्यामुळे नागरिक, व्यापारी, कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. शहरातील कचरा प्रश्नाला बगल देण्यासाठी महापालिका असे उपक्रम राबवीत आहे. खाजगी जागेवरील फलक काढण्याचे अधिकार मनपाला नाहीत आदी असंख्य प्रश्न उपस्थित करण्यात येत होते.शहरात दहा हजार अनधिकृत होर्डिंगमहापालिका अधिकाºयांच्याच सर्वेक्षणानुसार शहरातील ११५ वॉर्डांमध्ये किमान दहा हजार अनधिकृत होर्डिंग, पोस्टर्स, बॅनर्स असतील, असा अंदाज आहे. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी दोन हजार होर्डिंग काढण्यात आले. आणखी आठ हजार होर्डिंग काढणे बाकी आहेत. रविवारी सुट्टीच्या दिवशीही पथक काम करणार आहेत. मंगळवार ३१ जुलैपर्यंत शहर चकाचक करण्याचा मनोदय मनपा आणि पोलिसांनी व्यक्त केला आहे.गुन्हा दाखल करण्याची वेळ आली नाही...बीड बायपास रोडवर पटेल लॉन येथे झोन क्र. ८ च्या पथकाला विरोध करण्यात आला. अनेकदा समजूत घातल्यानंतरही व्यापारी ऐकण्यास तयार नव्हते. त्यामुळे पोलीस आणि मनपाने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. मात्र व्यापाºयांनी नमते घेतल्याने गुन्हा दाखल करण्यात आला नाही.पथकांनी अशी केली कारवाईसकाळी ६ वाजता महापालिकेच्या प्रत्येक झोनमध्ये पथक वाहनांसह सज्ज ठेवण्यात आले होते. ७ वाजता पथक कारवाईसाठी बाहेर पडले. शहरातील मुख्य डी. पी. रोडवरील पोस्टर्स, बॅनर्स काढण्यास सुरुवात करण्यात आली. सकाळी १० वाजेपर्यंत वाहनांची, नागरिकांची फारशी वर्दळ नसल्याने कारवाईला वेग आला होता.दुभाजकांच्या पोलवरील होर्डिंग काढण्यात सर्वाधिक त्रास होत होता. झोन क्र.४ मधील पथकाने जळगाव टी पॉइंट, हर्सूल टी पॉइंट, हर्सूल गावात जाऊन कारवाई केली. परत लेबर कॉलनी, सुभेदारीपर्यंत कारवाई केली.त्याचप्रमाणे झोन क्र. ६ मधील पथकाने मुकुंदवाडी पोलीस ठाण्यापासून मोहिमेला सुरुवात केली. चिकलठाणा गाव येथे कारवाई करून परत रामनगर, विठ्ठलनगर, जयभवानीनगर भागात कारवाई केली. झोन क्र. ७ च्या पथकाने सिडको बसस्थानक ते एन-१, सेव्हन हिल ते मध्यवर्ती जकातनाका, गजानन महाराज मंदिर ते सूतगिरणी चौक, शिवाजीनगर रेल्वेपटरी, बायपास, शहानूरमियाँ दर्गा, रोपळेकर रोडपासून परत वॉर्ड कार्यालयापर्यंत कारवाई केली.

टॅग्स :Municipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबादAurangabadऔरंगाबाद