शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
4
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
5
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
6
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
7
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
8
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
9
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
10
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
11
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
12
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
13
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
14
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
16
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
17
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
18
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
19
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
20
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
Daily Top 2Weekly Top 5

१ एप्रिलपासून व्यापाऱ्यांना परवाना शुल्क लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:02 IST

औरंगाबाद : शहरातील व्यापाऱ्यांना १ एप्रिलपासून परवाना शुल्क लावण्याची जोरदार तयारी महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. व्यापाऱ्यांनी कितीही विरोध ...

औरंगाबाद : शहरातील व्यापाऱ्यांना १ एप्रिलपासून परवाना शुल्क लावण्याची जोरदार तयारी महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. व्यापाऱ्यांनी कितीही विरोध केला, तरी प्रशासनासमोर कोणताही पर्याय नाही. शासन आदेशानुसार परवाना शुल्क कोणत्याही परिस्थितीत वसूल करावाच लागणार आहे. या कामासाठी महापालिकेच्या वसुली कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात येणार आहे.

राज्य शासनाने सात वर्षांपूर्वी महापालिकेला व्यापाऱ्यांकडून परवाना शुल्क वसूल करावा, असे आदेश दिले होते. या निर्णयाची अंमलबजावणी न केल्याने नागपूर येथील महालेखाकार कार्यालयाने आक्षेप नोंदविला. त्यानंतर, राज्य शासनाने नियुक्त केलेल्या लोकलेखा समितीने याची गंभीर दखल घेतली. दोन आठवड्यांपूर्वी महापालिकेने समितीस १ एप्रिलपासून कर लावण्यात येत असल्याचे आश्वासन दिले.

१ एप्रिलपासून परवाना शुल्क वसुलीसाठी महापालिकेचा कर मूल्यनिर्धारण विभागाने जोरदार तयारी सुरू केली आहे. राज्यातील इतर महापालिकांमध्ये ज्या पद्धतीने परवाना शुल्काची वसुली करण्यात येत आहे. त्याच पद्धतीने शहरातही वसुली करण्यात येणार असल्याची माहिती कर निर्धारक व संकलक अपर्णा थेटे यांनी दिली.

दरवर्षी आठ कोटी उत्पन्न न येण्याची शक्यता

परवाना शुल्कामुळे महापालिकेच्या तिजोरीत दरवर्षी किमान आठ कोटी रुपये येतील, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. शुल्क लावण्यासंदर्भात सर्वसाधारण सभेने मंजुरीही दिलेली आहे. प्रशासनाकडून दोन ते तीन दिवसांमध्ये अंतिम मंजुरी मिळण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.

इतर करांसोबत शुल्क घेणे अशक्य

शहरातील व्यापाऱ्यांनी परवाना शुल्काच्या मुद्द्यावर वारंवार महापालिका प्रशासनाची भेट घेतली. व्यापाऱ्यांकडून शासन वेगवेगळ्या पद्धतीने कर वसुली करीत आहे. त्याच करांमध्ये व्यापाऱ्यांना परवाना शुल्क लावून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. मात्र, अशा पद्धतीने कर वसुली करण्याची कोणतीही तरतूद कायद्यात नसल्याचे सूत्रांनी नमूद केले.