शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

नियोजनासाठी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

By admin | Updated: March 20, 2016 00:49 IST

लातूर : लातूर शहर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा यंत्रणेवर नियोजन आणि देखरेख करण्यासाठी जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी

लातूर : लातूर शहर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा यंत्रणेवर नियोजन आणि देखरेख करण्यासाठी जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी तीन प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या शनिवारी नियुक्त्या केल्या आहेत़ उपजिल्हाधिकारी कमलाकर फड, निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी प्रकाश खपले, उपविभागीय अधिकारी प्रताप काळे हे नियुक्त करण्यात आले आहेत़ लातूर शहराचा पाणीपुरवठा सुरळीतपणे करण्यासाठी महापालिकेच्या बरोबरीने नियोजन करून त्यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी या तिघांवर सोपविण्यात आली आहे़ शनिवारी निघालेल्या आदेशाने लातूरच्या पाणी पुरवठ्यात प्रशासकीय अधिकारी आले आहेत़ प्रत्यक्ष पाणी वाटपाच्या नियोजनात वर्ग एकचे अधिकारी एखाद्या शहराच्या नियोजनात सक्रीय होण्याची बहुदा राज्यातील ही पहिलीच घटना आहे़ महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला टंचाईच्या काळात पाणी वाटपाचे नियोजन पेलत नसल्याने गोंधळ निर्माण होत आहे़ किती पाणी आले, किती गेले, प्रत्यक्षात गरज किती पाण्याची याचे गणितही मनपा कर्मचाऱ्यांना कळत नसल्याने शहराच्या पाणी वाटपाच्या नियोजनात जिल्हा प्रशासनाने अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे़ त्यामुळे लातूरकरांना आता वेळेत पाणी मिळवून देण्यासाठी या अधिकाऱ्यांसह एमजेपीचे कर्मचारीही आले आहेत़ मनपाच्या विभाग प्रमुखांना प्रभाग वाटपाची जबाबदारी आहे़ काही अभियंत्यांकडे शहरातील पाण्याच्या टाकीतून टँकर वाटपाचे नियोजन आहे़ प्रत्येक कुटुंबाला किमान २०० लिटर्स पाणी ६ ते ८ दिवसांनी पोहचविण्याचा प्रयत्न हे नवीन नियुक्त करण्यात आलेले अधिकारी करतील, असे सूत्रांनी सांगितले़ डोंगरगाव, भंडारवाडी, माकणी, साई येथून पाणी संकलित केले जात असले तरी वाटपाचे नियोजन विस्कटले आहे़