शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

कुलसचिवांची नियुक्ती बेकायदाच..

By admin | Updated: September 21, 2016 00:21 IST

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रदीप जब्दे यांची नियुक्तीच बेकायदा असून, शासनाने आणि विद्यापीठाने त्यांचे वेतन अदा करूनये,

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रदीप जब्दे यांची नियुक्तीच बेकायदा असून, शासनाने आणि विद्यापीठाने त्यांचे वेतन अदा करूनये, अशा प्रतिक्रिया विद्यापीठ वर्तुळात उमटल्या आहेत. कुलसचिवपदाच्या मुलाखतीत अपात्र ठरलेला माणूस पुन्हा त्याच पदावर येण्यासाठी पात्र कसा ठरला असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे. कुलगुरूडॉ. बी. ए. चोपडे यांनी आपल्या अधिकारात डॉ. जब्दे यांची नियुक्ती केली असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, कुलगुरूंना अशी बेकायदा नियुक्ती करण्याचा अधिकार नसल्यानेच उच्च शिक्षण सहसंचालकांनी डॉ. जब्दे यांने वेतन रोखल्याचेही विद्यापीठाच्या अधिकार मंडळावर काम केलेल्या प्राध्यापकांनी सांगितले. विद्यापीठात कायदेशीर पद्धतीने काम चालतच नसल्याची उद्विग्न करणारी प्रतिक्रियाही काहींनी व्यक्त केली. दरम्यान, डॉ. जब्दे यांचे वेतन रोखल्याचे वृत्त माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर डॉ. जब्दे यांनी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास कुलगुरू डॉ. चोपडे यांची भेट घेऊन चर्चा केली. कुलगुरूंनी कुलसचिव म्हणून डॉ. प्रदीप जब्दे यांची केलेली नियुक्ती ही बेकायदाच आहे. एखाद्याने चुकीचा निर्णय घेतला असेल तर त्याची भरपाई निर्णय घेणाऱ्या व्यक्तीकडून केली पाहिजे, असा पूर्वी नियम होता. त्या न्यायाने डॉ. जब्दे यांच्या चुकीच्या नियुक्तीला कुलगुरूजबाबदार आहेत. त्यांच्याकडून भरपाई मागावी लागेल. विद्यापीठात सध्या बेकायदा काम करण्याची स्पर्धाच लागली आहे. कुलसचिव नियुक्ती हा त्या बेकायदा कामाचाच एक भाग आहे. - अण्णासाहेब खंदारे, माजी सिनेट सदस्य