लोकमत कॅम्पस क्लब आणि गुरूकूल ऑलिम्पियाड स्कूलतर्फे रविवार, दि. ३१ रोजी मुलांसाठी शाळा निवडायची कशी, या विशेष वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये डॉ. तांबट यांनी पालकांशी सविस्तर संवाद साधला आणि शाळा निवडताना कोणत्या गोष्टी प्रामुख्याने तपासल्या पाहिजेत, याची सखोल माहिती दिली.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, भरकटलेल्या शिक्षण व्यवस्थेला सरळ मार्गावर आणण्याचे काम नवे शैक्षणिक धोरण करणार आहे. यामध्ये नववी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार करिअर निवडण्याचे स्वातंत्र्य असेल. या धोरणाची अंमलबजावणी काही काळानंतर होणार असली, तरी गुरूकूल ऑलिम्पियाडची सुरुवातच या धोरणानुसार झाली आहे. त्यामुळेच विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे करिअर निवडता यावे, यासाठी गुरूकूल शाळेत अनोखी करिअर लॅब तयार करण्यात आली आहे.
शाळेसाठी बोर्ड कसे निवडावे हे सांगताना डॉ. तांबट म्हणाले की, सगळे बोर्ड चांगले असतात. फक्त त्यांची उद्दिष्टे वेगळी आहेत. अनेकदा आपल्या आजूबाजूची मुले ज्या बोर्डात जातात, तेथेच पालक कोणताही विचार न करता आपल्या मुलांना प्रवेश देतात. पण हे अत्यंत चुकीचे आहे, असेही त्यांनी नमूद केले.
जे पालक भविष्यात परदेशी जाणार आहेत, त्यांनीच आपल्या मुलांना आयबी आणि आयसीएसई बोर्डला प्रवेश द्यावा. मात्र आज अनेक पालकांसाठी आयबी आणि आयसीएसई बोर्ड हे केवळ एक फॅशन स्टेटमेंट झाले आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा ताण येत आहे. एसएससी बोर्डने काळानुसार बदल केले नाहीत, त्यामुळे त्यांचे जुने वैभव आता कमी होत चालले आहे. शिवाय स्पर्धा परीक्षांचा गाभा आज सीबीएसई अभ्यासक्रमावर आधारलेला आहे. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करता, सीबीएसई बाेर्ड आज विद्यार्थी आणि पालक दोघांसाठीही सर्वोत्तम आहे, असे डॉ. तांबट यांनी स्पष्ट केले.
शैक्षणिक विकासासोबत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर, खेळाचे विस्तीर्ण मैदान, विविध खेळांसाठी तयार करण्यात आलेले क्लब, तज्ज्ञ शिक्षणमंडळी, ब्रीज कोर्स, शहराच्या मध्यवर्ती भागात शाळेची इमारत, अशी गुरूकूल ऑलिम्पियाड स्कूलची अनेक वैशिष्ट्येही त्यांनी सांगितली.
चौकट
शाळेमध्येच फाउंडेशन कोर्स
गुरूकूल ऑलिम्पियाड शाळेमध्ये कोटा आणि इतर शहरातून येणाऱ्यातज्ज्ञ शिक्षकांद्वारे विद्यार्थ्यांकडून विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेण्यात येते. इयत्ता सहावी आणि त्यापुढील वर्गांसाठी शाळेतर्फे घेण्यात येणारा फाउंडेशन कोर्स अनिवार्य आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना फाउंडेशन आणि विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी वेगळा क्लास लावण्याची गरज पडत नाही, असेही डॉ. तांबट यांनी नमूद केले. शाळेची प्रवेश प्रकिया सुरू झाली असून, सोमवार ते शनिवार दु. १ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पालक शाळेत भेट देऊ शकतात.