शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

आणखी एका विद्यार्थ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 01:11 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वसतिगृहात पुन्हा एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वसतिगृहात पुन्हा एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली. गणेश शंकरराव कोपूरवाड (२३, रा. बिलोली, ह. मु. माजलगाव) असे या विद्यार्थ्याचे नाव असून, तो विद्यापीठातील संगणकशास्त्र विभागात एम.एस्सी.च्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. त्याच्याजवळ सापडलेल्या सुसाइड नोटनुसार, मुलीच्या एकतर्फी प्रेमातून होणाºया छळास कंटाळून त्याने आत्महत्येचे पाऊल उचलले असावे, असे सकृतदर्शनी वाटत असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. प्रेमप्रकरणातून विद्यार्थ्याने आत्महत्या करण्याची विद्यापीठातील ही मागच्या पंधरा दिवसांमधील दुसरी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, विद्यापीठातील वसतिगृह क्रमांक १ मध्ये गणेश त्याचा लहान भाऊ उमेश व इतर दोन मित्रांसह खोली क्रमांक ९८ मध्ये राहत होते. विद्यापीठात एम.एस्सी प्रथम वर्षात प्रवेश मिळाल्यानंतर तो तीन दिवसांपूर्वीच शनिवारी येथे राहायला आला होता.सुसाइड नोट ‘जशीच्या तशी....’संगीता या मुलीने माझा तीन वर्षे मला छळत राहिली. तिला बोलत जाऊ नको म्हणालो तरी बोलत राहिली. मी बोलणं सोडून दिलं. तिला रिप्लाय पण देणं सोडून दिलं; पण तिने कोमल या तिच्या मैत्रिणीच्या एफबी अकाऊंटवरून मला बोलत राहिली. मला हे २ महिने समजलं नाही. मी कोमल समजून बोलायचो. नंतरही बोलणं बंद केलं तरी बोललो.मागच्या एक वर्षापासून तिने मला खूप त्रास दिला. तिने रेवती या तिच्या मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडला सांगितलं. त्याने मला माजलगावमध्ये राहू देणार नाही आणि त्याच्यासोबतच्या दिनेश या मुलाने मला जिवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे मला घरातून बाहेर पण पडायला भीती वाटत होती. मी नांदेडचा आहे असं म्हणून त्यांनी मला खूप त्रास दिला. काल पहिला दिवस होता माझा डिपार्टमेंटला, तर तिने मला मारण्यासाठी डिपार्टमेंटचे चार मुलं पाठविले होते. ते कन्टिन्यू माझ्या मागेपुढे फिरायचे. रेवती या मुलीने, काल त्या मुलांनी आणि संगीता हिला घेऊन मला टॉर्चर केले आहे. (या चिठ्ठीतील नावे बदलून काल्पनिक टाकली आहेत.)