शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळकांचे साहित्य मिळणार एका क्लीकवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 18:34 IST

विद्यापीठातील ग्रंथालयातर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांचे साहित्य  विद्यापीठाच्या संकेतस्थळावर एका क्लीकवर उपलब्ध

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थी, कर्मचारी आणि प्राध्यापकांमध्ये प्रचंड क्षमता आहे. याचा प्रत्यय मागील १५ दिवसांच्या काळात आला. योग्य नेतृत्व व समन्वयाचा अभाव असल्याने प्रगती होऊ शकली नाही. आगामी काळात नकारात्मक प्रतिमा सुधारण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ग्रंथालयातर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांचे साहित्य  विद्यापीठाच्या संकेतस्थळावर एका क्लीकवर उपलब्ध करून देण्यात आले. या उपक्रमाचे उद्घाटन कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य किशोर शितोळे,  संचालक डॉ.धर्मराज वीर, अण्णाभाऊ साठे अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. संजय सांभाळकर, डॉ. दिलीप अर्जुने, प्रा. संजय गायकवाड यांची उपस्थिती होती. यावेळी कुलगुरू  म्हणाले,  गेल्या काही काळात संशोधनाचा दर्जा रसातळाला गेला आहे. भरमसाठ शोधनिबंध व प्रबंध सादर केले जात आहेत. ही चिंतेची बाब आहे. या संशोधनात गुणवत्ता आणण्यासाठी उच्चस्तरीय प्रयत्न केले जातील, असेही डॉ. येवले यांनी स्पष्ट केले. विद्यापीठाच्या ग्रंथालयात देशातील पहिल्या टॉप टेनमध्ये जाण्याची क्षमता आहे. या इमारतीमध्ये १५० आसनाची क्षमता असलेले सभागृह लवकरच बांधण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना किशोर शितोळे म्हणाले, अण्णाभाऊ व टिळक यांचे साहित्य कमी वेळेत ऑनलाईन करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. या केंद्राला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे सांगितले. ग्रंथालयाचे संचालक डॉ. धर्मराज वीर यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन चक्रधर कोठी यांनी केले. आभार सहायक ग्रंथपाल सतीश पद्मे यांनी मानले. कार्यक्रमासाठी डॉ. शाहिस्ता परवीन, डॉ. कैलास अंभुरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी माहितीशास्त्रज्ञ गजानन खिस्ते, प्रोग्रामर माधुरी कुलकर्णी, गणेश कड, सूरज लव्हंदे, मंगल फरताडे, विजया सूर्यवंशी, कविता तुपे, इरफान शेख, मंगल बागूल, शेख हनिफ आदींनी प्रयत्न केले. 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादliteratureसाहित्यEducation Sectorशिक्षण क्षेत्र