शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

अन्यायाविरूद्ध बंड करणाºया अण्णा भाऊंच्या नायिका- प्रमोद गारोडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 00:14 IST

अण्णा भाऊंच्या नायिका कोण्या एका जाती-धर्माच्या नव्हत्या तर त्या स्त्रीत्वाचे रक्षण करणाºया आणि अन्यायाविरूद्ध बंड करणाºया रणमर्दिनी होत्या, असे प्रतिपादन प्रा़ डॉ़ प्रमोद गारोडे यांनी केले़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: अण्णा भाऊंच्या नायिका कोण्या एका जाती-धर्माच्या नव्हत्या तर त्या स्त्रीत्वाचे रक्षण करणाºया आणि अन्यायाविरूद्ध बंड करणाºया रणमर्दिनी होत्या, असे प्रतिपादन प्रा़ डॉ़ प्रमोद गारोडे यांनी केले़महापालिकेच्या वतीने साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त रविवारी शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात व्याख्यानाचे आयोजन केले होते़ यावेळी डॉ़ गारोडे अण्णाभाऊ साठे यांच्या कादंबºयांतील नायक व नायिका या विषयावर बोलत होते़कार्यक्रमाचे उद्घाटन महापौर शैलजा स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले़ अध्यक्षस्थानी उपायुक्त रत्नाकर वाघमारे होते़ प्रमुख पाहुणे म्हणून शांताबाईफेम गीतकार, गायक संजय लोंढे, उपसभापती ललिता बोकारे, नगरसेविका डॉ़ करूणा जमदाडे, रजिया बेगम, उपायुक्त संतोष कंदेवाड, कमलाबाई मुदीराज, वीरेंद्रसिंघ गाडीवाले, स्टेडिमय व्यवस्थापक रमेश चौरे, शहर अभियंता माधव बाशेट्टी, शिवा कांबळे यांची उपस्थिती होती़ प्रारंभी सोहळ्याचे स्वागताध्यक्ष माजी उपमहापौर उमेश पवळे, नगरसेविका जयश्री जाधव यांनी मान्यवरांचे स्वागत अण्णाभाऊ साठे यांचे ग्रंथ देऊन केले़डॉ़ गारोडे म्हणाले, अण्णा भाऊंचे साहित्य केवळ विशिष्ट वर्गासाठी नव्हते, तर ते समस्त मानवजातीच्या दु:ख, वेदनेचे आणि स्वाभिमानाचे दस्तावेज आहे़ त्यामुळे जगभरात अण्णाभाऊंचे साहित्य भाषांतरित झाले़ अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यात नायिकांना मानाचे स्थान दिले आहे़ त्यांच्या प्रत्येक कथा, कादंबºयांतील नायिका घरंदाज, सुशील आणि विचारांची झेप घेणाºया होत्या़त्यांची नायिका शील रक्षणासाठी एखाद्याला मारण्यास तयार होत होती़ केवळ गोरगरीब, कष्टकरी, वंचित समाजातीलच नव्हे, तर उच्चवर्णीय समाजातीलही त्यांची नायिका होती़ अत्यंत सुंदर, देखण्या नायिका अस्सल मराठामोळ्या होत्या़ अण्णाभाऊंनी सर्व नायिकांची मुक्तकंठाने वर्णन केले आहे़ चित्रा, आवडी, चंदन, वैजयंता अशा कितीतरी नायिका वाचकांच्या मनात आदरभाव निर्माण करतात़ मराठी साहित्यात अण्णा भाऊंच्या नायिकाप्रधान कथा, कादंबºयांचे अढळ स्थान आहे़महापौर शैलजा स्वामी म्हणाल्या, अण्णा भाऊंनी आपल्या साहित्यातून अन्याय, अंधश्रद्धा, पारंपरिक गोष्टीवर प्रहार केला़ म्हणूनच अण्णाभाऊ विशिष्ट जातीपुरते मर्यादित राहत नाहीत़ अण्णा भाऊंचे विचार सर्वांना कळावेत, यासाठी महापालिका मागील आठ वर्षांपासून अशा व्याख्यानाचे आयोजन करते़ सामाजिक बांधिलकी जोपासणारी नांदेड महापालिका एकमेव पालिका आहे, असेही त्यांनी सांगितले़ प्रास्ताविक कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे यांनी केले़ सूत्रसंचालन बालाजी गवाले यांनी केले. अभियंता प्रकाश कांबळे यांनी आभार मानले़