शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

हिमायत बागेला वाली कोण

By admin | Updated: June 22, 2014 00:51 IST

गजानन दिवाण , औरंगाबाद इतिहासाचा मोठा वारसा असलेली हिमायत बाग सध्या रिकामटेकड्यांचा बाजार बनली आहे.

गजानन दिवाण , औरंगाबादइतिहासाचा मोठा वारसा असलेली हिमायत बाग सध्या रिकामटेकड्यांचा बाजार बनली आहे. भल्या पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत कोणी मॉर्निंग-इव्हिनिंक वॉकच्या नावाखाली, कोणी हौसी फोटोग्राफीसाठी तर कोणी गांजा-दारूच्या पार्ट्यांसाठी या बागेची धूळ उडवतो. नागरिकांना दिलेले हे अति स्वातंत्र्य हिमायत बागेच्या जीवावर उठले आहे. ३५० एकर परिसरात पसरलेल्या या बागेचा काही भाग वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि काही भाग सामाजिक वनीकरण विभागाच्या कार्यक्षेत्रात येतो. विद्यापीठाने या बागेत फळसंशोधनाचे काम मोठ्या जोमाने हाती घेतले आहे. मात्र, लोकांच्या अति हस्तक्षेपामुळे या बागेतील फळबागांसोबतच झाडे-झडुपे आणि पक्ष्यांवर संकटाचे मोठे ढग जमू लागले आहेत.वेळ सकाळी सहाची. हिरव्यागार बागेतला कुठलाही कोपरा माणसांशिवाय दिसत नाही. कुठल्यातरी एका गेटला गाडी पार्क करायची आणि मनसोक्त निसर्गानंद घ्यायचा. तो घेत असतानाच रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांची आंबे तोडायची तर कधी जांभळे तोडायची. यासाठी मोठाल्या फांद्यांचा बळी घ्यायचा. तरीही कोणी हटकत नाही. फळसंशोधन केंद्राचा कुठलाच कर्मचारी तुम्हाला दिसत नाही. त्यामुळे आंबे-जांभूळ तोडत असताना रस्ता सोडून रानात जायचे. वाटेत मोर-लांडोर नाचण्यात दंग असले तरी वाट नाही सोडायची. अगदी रस्त्यावरील भटके कुत्रे हाकलावे तसे त्यांनाच हाकलून द्यायचे... मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्यांची ही वर्दळ. त्यांची वेळ संपली की गांजा-दारू पिणाऱ्यांचा वॉक सुरू होतो. गवताआड, एखाद्या कोपऱ्यात आडोशाला पक्षी-प्राण्याने आपली जागा तयार करावी, अशा जागा या बहाद्दरांनी तयार केल्या आहेत. औरंगजेबाच्या काळात सुरक्षारक्षक जेथून टेहळणी करायचे, तिथे या लोकांची गांजा-दारूची पार्टी चालते. त्यांची ही दारू चढून उतरली तरी त्यांना कोणी उठा म्हणत नाही.घरफोड्या-दरोडे यातले गुन्हेगार पोलिसांना शोधून-शोधून सापडत नाहीत. या आरोपींचेही निवांत वेळ घालविण्याचे हेच ठिकाण. जे वाट्टेल ते खायचे, कुठेही जायचे, कुठेही झोपायचे, असा त्यांचा रोज उद्योग सुरू असतो.नागरिकांवर बंधने आणाया बागेत मनसोक्त वावरणाऱ्या नागरिकांवर बंधने आणण्याची गरज आहे. निसर्गाला बाधा पोहचेल असे कुठलेही वर्तन त्यांनी करता कामा नये. असे झाले तरच हिमायत बागेचे वैभव कायम राहील, अशी प्रतिक्रिया पर्यावरणप्रेमी व पक्षी निरीक्षक किशोर पाठक यांनी दिली. ऐतिहासिक बाग...काँक्रिटीकरणाच्या या जगात ऐतिहासिक वारसा असलेल्या हिमायत बागेने आपले वैभव सध्या तरी कायम ठेवले आहे. या बागेतील ११०.२९ हेक्टर क्षेत्रावर फळबाग संशोधनाचे काम सुरू आहे. इस्रायल आणि भारत सरकारच्या संयुक्त विद्यमाने येथे आठ कोटींचा केशर आंबा गुणवत्ता प्रकल्प राबविला जात आहे. याअंतर्गत या वर्षी तब्बल आठ हेक्टरवर केशर आंब्याची लागवड केली जाणार आहे. याशिवाय या बागेत चिकू, सीताफळ, बोर, नारळ, कवट, डाळिंब, चिंचेची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. मॉर्निंग वॉक करा, पण...बागेत मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. कुठलाही हस्तक्षेप न करता शांतपणे त्यांनी तो केला तर फळ संशोधनाला गती येईल, अशी आशा हिमायत बागेतील फळसंशोधन केंद्राचे संजय पाटील यांनी व्यक्त केली. यांना कोण आवरणार? सोशल मीडियावर अधिकाधिक लाईक मिळविण्यासाठी फोटोग्राफर येथे गठ्ठ्याने मिळतात. पक्षी कुठला याच्याशी फारसे देणे-घेणे नसलेला हा हौसी कलावंत त्याचा पाठलाग करीत कुठपर्यंतही जातो आणि त्याला दमाला आणतो. फळबाग, पक्षी-कीटकांचा कुठलाही विचार त्याला शिवत नाही. जसे रिकामटेकड्या माणसांचे तसेच भटक्या कुत्र्यांचे. या बागेत पावलोगणिक ते भेटतात. मोर हा जास्त उडू न शकणारा पक्षी. चारही बाजूंनी घेरले तर तो सहज सापडतो. हा पक्षी या भटक्या कुत्र्यांचा बळी ठरतो. मोरांची अंडी हे तर त्यांचे आवडीचे खाद्य. माणसांवर पाळत ठेवणे कठीण तिथे या भटक्या कुत्र्यांना कोण आवरणार? अशा रिकामटेकड्या माणसांच्या आणि कुत्र्यांच्या बाजारात कुठला तरी पक्षी-प्राणी कसा जगेल? तेच हिमायत बागेत घडत आहे.