शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

...आणि आरटीओंना समजल्या अडचणी

By admin | Updated: June 22, 2016 00:53 IST

औरंगाबाद : खाजगी ट्रॅव्हल्सच्या बसचालकांच्या मनमानी कारभारामुळे अनेकदा प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. परंतु अशा ट्रॅव्हल्सवर कारवाई करण्याकडे आरटीओ प्रशासन साफ दुर्लक्ष करते

औरंगाबाद : खाजगी ट्रॅव्हल्सच्या बसचालकांच्या मनमानी कारभारामुळे अनेकदा प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. परंतु अशा ट्रॅव्हल्सवर कारवाई करण्याकडे आरटीओ प्रशासन साफ दुर्लक्ष करते. मात्र, जेव्हा खुद्द आरटीओंनाही त्याचा फटका बसतो तेव्हा प्रवाशांच्या अडचणींची जाणीव होते. तेव्हा कुठे त्यांनी ट्रॅव्हल्सविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यासाठी पाऊल उचलले.अनेकदा ट्रॅव्हल्सच्या चालकांकडून मनमानी कारभार केला जातो. त्यातून प्रवाशांना नाहक गैरसोयीला सामोरे जावे लागते. एसी बंद करणे किंवा अचानक एसी वाढविणे, लघुशंका, इतर कारणासाठी बस न थांबविणे अशा समस्यांना अनेकदा प्रवाशांना सामोरे जावे लागते. या प्रकारांची ऐन प्रवासात तक्रार करावी कोठे, असा प्रश्न प्रवाशांसमोर असतो. आरटीओ कार्यालयाकडून खाजगी बसेसविरुद्ध कारवाईकडे दुर्लक्ष केले जाते. एका ट्रॅव्हल्समधून नुकतेच आरटीओंना चालकाच्या गैरवर्तनाचा अनुभव आला. मुंबई येथील बैठकीसाठी ते ट्रॅव्हल्स बसमधून निघाले होते. यावेळी काही प्रवाशांनी महत्त्वाच्या कामासाठी बस थांबविण्याची विनंती चालकाकडे केली. परंतु चालकाने दुर्लक्ष करून काही अंतरावर बस नेऊन थांबविली.प्रवाशांनी विनंती केल्यावरही बस का थांबविली नाही, याबाबत आरटीओंनी चालकाला विचारणा केली. त्यावेळी चालकाने थेट त्यांच्याशीही अरेरावी केली. मुंबईहून परत येताच त्यांनी प्रवाशांबरोबर गैरवर्तन केल्याची तक्रार नोंदवून संबंधित ट्रॅव्हल्सवर कारवाईचा बडगा उगारला.ट्रॅव्हल्समधून प्रवास करताना आलेल्या अनुभवानंतर आरटीओंना प्रवाशांच्या व्यथा कळाल्या. परंतु नियमितपणे कारवाई झाल्यास ट्रॅव्हल्सच्या मनमानी कारभारावर कायमचा चाप बसेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.