शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

अन् बळीराजाने सुरू केली विहिरीच्या पाण्यावर पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:05 IST

करमाड : मान्सून पूर्व व रोहिणी नक्षत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांना पेरणीपूर्व मशागतची कामेदेखील करता आली नाहीत. ज्या ...

करमाड : मान्सून पूर्व व रोहिणी नक्षत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांना पेरणीपूर्व मशागतची कामेदेखील करता आली नाहीत. ज्या शेतकऱ्यांनी मशागतीचे काम पूर्ण केले होते त्यांनी पेरणी करून घेतली. ज्यांना पेरणीचा मुहूर्त अगोदर साधता आला नाही ते पावसाची वाट बघून बघून आता विहिरीच्या पाण्यावर पेरणी करण्याचा निर्णय घेत आहेत.

औरंगाबाद तालुक्यात मान्सून पूर्व व रोहिणी नक्षत्रात जोरदार पावसाने हजेरी लावली. यावर्षी चांगला पाऊस होईल, अशी भविष्यवाणी हवामान खात्याने वर्तविल्यामुळे यावर्षी देखील खरिपाची पेरणी वेळेवरच होईल अशी परिस्थिती निर्माण झाली. मशागतीची कामे पूर्ण झाली होती, त्या शेतकऱ्यांनी कपाशी, मका, तूर, सोयाबीन, मूग, उडीद या खरीप पिकांची लागवड करण्यास सुरुवात केली. मात्र ज्या शेतकऱ्यांची मशागतीचे कामे पूर्ण झालेली नव्हती अशा शेतकऱ्यांची मशागतीचे कामे सततच्या पावसाने मुळे जवळपास १५ दिवस लांबली होती. १० जूननंतर पाऊस उघडल्यानंतर या शेतकऱ्यांनी मशागतीची कामे पूर्ण केली व पेरणी करण्यासाठी पावसाची वाट बघू लागले. मात्र जवळपास १५ दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या थांबवल्या. आता पावसाची किती दिवस वाट बघायची पुढे चांगला पाऊस झाला तरी खरिपाची लागवड वेळेवर झाली नाही, तर उत्पादनात घट होईल म्हणून ज्या शेतकऱ्यांच्या विहिरींना पाणी आहे किंवा ठिबक, तुषार सिंचनासारखे इतर स्त्रोत उपलब्ध आहेत. अशा शेतकऱ्यांनी कोरड्यात कपाशी, मका, तूर अशी पीक लागवड करण्यास सुरुवात केली. ज्यांच्याकडे पाण्याचे स्त्रोत उपलब्ध नाही असे कोरडवाहू शेतकरी मात्र आभाळाकडे डोळे लावून बसले आहे.

जूनच्या सुरुवातीला पेरण्या केल्या, त्या शेतकऱ्यांना आता पिकांना पाणी देण्याची गरज पडत आहे. त्यातील सर्वच शेतकऱ्यांकडे पाणी देण्याचे स्त्रोत किंवा पाणीच उपलब्ध नाही असे कोरडवाहू शेतकरी पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. अशा शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचे संकट ओढावणार अशी भीती निर्माण झालेली आहे.

फोटो - औरंगाबाद तालुक्यातील गाढेजळगाव येथील शेतकरी अशा पद्धतीने कपाशीला पाणी भरून मका पिकाला स्प्रिंकलरद्वारे पाणी देत आहे.