शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णवाहिका चालकाची तारेवरची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:05 IST

वासडी : ग्रामीण भागात कोरोना पसरत आहे. त्यामुळे सर्व कोरोना योद्धे आपापल्या स्तरावरून तत्पर सेवा देत आहेत. ...

वासडी : ग्रामीण भागात कोरोना पसरत आहे. त्यामुळे सर्व कोरोना योद्धे आपापल्या स्तरावरून तत्पर सेवा देत आहेत. नाचनवेल, कंरजखेडसह वासडी परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसह व रुग्णवाहिका चालकांची अग्निपरीक्षा सुरू आहे. नियमित कामाबरोबरच कोविडमुळे अतिरिक्त कामाचा ताण वाढला आहे, तरीदेखील हसतमुख होत आपल्या कामातील मिळणारे समाधानच त्यांना अधिक ऊर्जा देत आहेत.

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे कोरोना चाचणीचे प्रमाणदेखील वाढले आहे. औरंगाबादला कोरोना सॅम्पल तपासणीसाठी पाठविण्यासाठी कन्नड येथे सातत्याने फेऱ्या माराव्या लागत आहेत, तर गावागावात जाऊन शेत शिवारातून आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत कोरोना चाचणीचे नमुने घेऊन जावे लागते. त्यातच जननी शिशू सुरक्षा योजनेला प्राधान्य द्यावे लागत आहे. गर्भवती मातेला योग्य वेळी उपचारासाठी दाखल करण्यासाठी रात्री-बेरात्री रुग्णवाहिका चालकांना धावपळ‌ करावी लागत आहे.

रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हा भाव मनात ठेवून चालक काम करीत आहेत. मात्र, ही जबाबदारी पार पडताना त्यांना कोविडचे ही अतिरिक्त काम अंगावर घेऊन करावे लागत आहे. लसीकरणासाठी देखील प्रत्येक उपकेंद्रात जावे लागत आहे. त्यामुळे रुग्णवाहिका चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

कोट

कितीही थकवा आला तरी रुग्णांचा त्रास आणि नातेवाइकांची चिंता पाहून काम करावे लागते. मात्र, त्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान हा कामाचा थकवा दूर करते. कामात खूप समाधान मिळते. सध्या अतिरिक्त ताण वाढला आहे. हुस्नउद्दीन पठाण, नाचनवेल प्रा. आरोग्य केंद्र, रुग्णवाहिका चालक.

--

आरोग्यसेवेसाठी आम्हाला चोवीस तास तत्पर राहावे लागते. कर्तव्य पूर्ण केल्यावर रुग्णांच्या नातेवाइकांना समाधान झाल्याचे पाहून आनंद होतो. मी पंधरा वर्षांपासून या सेवेत कार्यरत आहे. कष्टाचे काम करूनही आम्ही कंत्राट पद्धतीवर काम करीत आहोत. शासनाने आमची दखल घ्यावी, अशी मागणी आहे.

- राहुल चौतमल, चालक, करंजखेड प्रा. आ. केंद्र.