औरंगाबाद : मराठवाड्याच्या साहित्य व्यवहाराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मराठवाडा साहित्य परिषदेची अद्ययावत सदस्य यादी नुकतीच प्रकाशित झाली आहे. मात्र, यादीतील सदस्य संख्येचा जिल्हानिहाय असमतोल सध्या चर्चेचा विषय बनला आहे. मराठवाडा साहित्य परिषदेची विविध कारणांमुळे दीर्घकाळ लांबलेली निवडणूक अखेर २३ फेब्रुवारी रोजी जाहीर झाली. येत्या १७ जुलैपर्यंत विविध टप्प्यांमध्ये ही प्रक्रिया चालणार आहे. त्यानंतर परिषदेची नवी कार्यकारिणी जाहीर होईल. या निवडणूक कार्यक्रमाच्या अनुषंगाने अद्ययावत सदस्य यादीही जाहीर करण्यात आली आहे.सध्याच्या या यादीनुसार परिषदेचे एकूण २६३० आजीव सभासद आहेत. यात मराठवाड्यातील २३९०, मराठवाड्याबाहेरील १९१, महाराष्ट्राबाहेरील २० व पत्ता नसलेले २९ सदस्य आहेत. मात्र, मराठवाडा साहित्य परिषद असे नाव धारण करणाऱ्या या साहित्य संस्थेत मराठवाड्यातील जिल्हानिहाय सदस्य संख्येतच मोठा प्रादेशिक असमतोल दिसून येतो. औरंगाबादचे ९६६ सदस्य आणि इतर जिल्ह्यांमध्ये हा आकडा कमाल ३५५ इतका आहे. त्यातही विशेष म्हणजे परिषदेची घटनादुरुस्तीची प्रक्रिया २००७ मध्ये म्हणजेच सात वर्षांपूर्वी सुरू झाली आणि ही घटनादुरुस्ती प्रत्यक्षात येण्यासाठी २०१५ साल उजाडावे लागले. या काळात नियमांप्रमाणे सभासद नोंदणी बंद असते. हे मान्य केल्यास नवे सदस्य नेमके कधी नोंदले गेले हा प्रश्न पुढे येत आहे. घटनादुरुस्ती सुरू होण्याआधी सदस्य संख्या १४२८ इतकी होती. आता १२०२ नवे सभासद कसे काय करून घेतले गेले, असा प्रश्न विचारला जात आहे.
मसापच्या सदस्य यादीतही असमतोल!
By admin | Updated: April 26, 2015 01:01 IST