शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
4
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
5
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
6
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
7
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
8
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
9
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
10
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
11
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
12
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
13
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
14
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
15
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
16
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
17
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
18
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
19
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
20
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं

अंबड पंचायत समिती बनली राजकीय आखाडा

By admin | Updated: May 24, 2014 01:38 IST

रवि गात, अंबड अंबड पंचायत समिती परिसर सध्या राजकीय आखाडा बनला आहे.

रवि गात, अंबड अंबड पंचायत समिती परिसर सध्या राजकीय आखाडा बनला आहे. एकाच आठवडयात पालकमंत्री राजेश टोपे व आ. संतोष सांबरे यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र पाणीटंचाई आढावा बैठका पार पडल्याने पंचायत समितीतील विविध विभागातील बहुतांश अधिकारी, कर्मचारी चांगलेच सुखावले आहेत. पदाधिकार्‍यांच्या गोंधळाचा फायदा घेत या अधिकारी, कर्मचार्‍यांनी सर्वसामान्य जनतेची कामे करणेच बंद केल्याचा आरोप नागरिकांमधुन होत आहे. या सर्व प्रकारामुळे पंचायत समिती राजकीय आखाडा बनल्याची चर्चा शहरात रंगत आहे. १४ मे रोजी पालकमंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली अंबड पंचायत समिती सभागृहात पाणी टंचाई आढावा बैठक झाली. यावेळी पालकमंत्री टोपे यांनी ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेत कामचुकार अधिकार्‍यांना चांगलेच फैलावर घेतले. टोपे यांनी गटविकास अधिकारी पी.जी.बनसोड यांचाही चांगलाच समाचार घेतला. पाणीटंचाई असणार्‍या गावांमध्ये पाणीटंचाई निवारणार्थ तत्काळ कामे सुरु करण्याचे आदेश दिले. या पाणीटंचाई आढावा बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे सभापतींचे पती रमेश पैठणे, उपसभापती रामदास कुरणकर, राष्ट्रवादीचे जि.प.सदस्य, प.स.सदस्य व पक्षाचे इतर पदाधिकारी हजर होते तर विरोधी शिवसेना-भाजपाचे सर्व सदस्य गैरहजर होते,हे विशेष. यानंतर २० मे रोजी पंचायत समितीच्या याच सभागृहात बदनापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष सांबरे यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीच्या सर्व विभागातील अधिकार्‍यांच्या उपस्थिती पुन्हा एकदा पाणीटंचाई आढावा बैठक पार पडली. या बैठकीत आ.सांबरे यांनी ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेत अधिकार्‍यांची कानउघाडणी केली, पुन्हा एकदा अधिकार्‍यांना तत्काळ कामे सुरु करण्याचे आदेश दिले. बैठकीस शिवसेनेचे जि.प.सदस्य, प.स.सदस्य यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी हजर होते तर पंचायत समिती सभापती, उपसभापती व राष्ट्रवादीचे इतर पं.स.सदस्य गैरहजर होते हे विशेष. विशेष म्हणजे एका आठवड्यात दोन पाणीटंचाई आढावा बैठका होऊन व दोन्ही लोकप्रतिनिधींना अधिकार्‍यांची कानउघाडणी करुनही अद्यापही तालुक्यातील पाणी टंचाईची अवस्था जैसे थे आहे. तालुक्यातील अनेक गावांमधील नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे वास्तव अद्यापही बदलेले नाही. अनेक गावांना टँकरने पाणी पुरवठा करण्याची नागरिकांची मागणी असतानाही ही मागणी अद्यापही पूर्ण झालेली नाही. याप्रमाणेच अनेक गावातील बोअर दुरुस्तीचे कामे ठप्प आहेत. मग या दोन्ही पाणी टंचाई आढावा बैठकीतुन काय साध्य झाले असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. वास्तविक पालकमंत्री राजेश टोपे व आ.संतोष सांबरे यांच्यात चांगला समन्वय असल्याचे वेळोवेळी पाहावयास मिळाले आहे. या दोघांची संयुक्त पाणी टंचाई आढावा बैठक पार पडली असती आणि दोघांनी सामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घेत अधिकार्‍यांची कानउघाडणी केली असती तर चित्र वेगळे दिसले असते. पालकमंत्री टोपे व आ.सांबरे यांना व्यवस्थित माहिती देत पंचायत समिती सभापती, उपसभापती व त्या-त्या पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी ही संयुक्त पाणी टंचाई आढावा बैठक घडवून आणणे गरजेचे होते. मात्र सभापती, उपसभापती व इतर पदाधिकार्‍यांना ग्रामीण भागातील पाणी टंचाईपेक्षा आपले राजकारण जास्त महत्वाचे वाटले. पाणी टंचाई सारख्या गंभीर प्रश्नावर ढिम्म झालेल्या पंचायत समिती प्रशासनास कार्यरत करण्यासाठी आता तरी सत्ताधारी व विरोधी पदाधिकार्‍यांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. दोन वेगवेगळ्या बैठका पार पडूनही तालुक्यातील पाणीटंचाई अद्यापही कायम आहे. (वार्ताहर)