शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

सहकार भारतीचे अखिल भारतीय अधिवेशन नांदेडात

By admin | Updated: September 7, 2014 00:28 IST

नांदेड : सहकार भारती कार्यकर्त्यांचे अधिवेशन नांदेड येथे आयोजित केली आहे,

नांदेड : महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणाऱ्या, बचत गट स्थापन करणाऱ्या संस्थाचे प्रमुख आणि स्वयंसहाय्यता समूह व संयुक्त दायित्व समूहातील सहकार भारती कार्यकर्त्यांचे दोन दिवसाचे अखिल भारतीय अधिवेशन व कार्यशाळा २० व २१ सप्टेंबर रोजी नांदेड येथे आयोजित केली आहे, अशी माहिती सहकार भारतीचे राष्ट्रीय संघटनमंत्री विजय देवांगण यांनी पत्रपरिषदेत दिली़ सामान्य लोकांची आर्थिक प्रगती आणि समाजात ऐक्य टिकविण्याची ताकद सहाकारामध्ये आहे, असे देवांगण यांनी सांगितले़ आगामी काळात महिला सक्षमीकरणाला निर्दिष्ट करणारी स्वयंसहायता समूह व संयुक्त दायित्वामध्ये योग्य कार्यकर्ता तयार करणे, समूहाच्या कार्यात गुणग्राहकता आणण्यासाठी तसेच मार्केटिंग, पॅकेजिंग, बँडिगची दिशा ठरवून प्रगतीला चालना देण्याचा प्रयत्न या अधिवेशनाच्या माध्यमातून होणार असल्याचे त्यांनी सांगितले़ कार्यक्रमास लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्यासह भाजप महिला आघाडीच्या राष्ट्रीय प्रमुख विजया रहाटकर, सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष समिश मराठे, सहकारी सेवा संस्थानचे कल्पक मणियार, सुधा कोठारी-पुणे, डॉ़ वृषाली किन्हाळकर, चंद्रीका चव्हाण-सोलापूर, विजयाताई भूसारी-नागपूर, भारतीय भट्ट, उद्योजक बी़ बी़ ठोंबरे आदींची उपस्थिती राहील, असेही त्यांनी सांगितले़ बचत गट, स्वयंसहाय्यता समूहामध्ये काम करणाऱ्या महिलांमध्ये नेतृत्व तयार करण्याची शक्ती निर्माण होते़ तसेच महिलांमध्ये एक आत्मविश्वास निर्माण करण्याची ताकद या क्षेत्रात आहे, असे दिवांगण यांनी सांगितले़ पत्रपरिषदेस अधिवेशनाचे नियोजित स्वागताध्यक्ष आ़ओमप्रकाश पोकर्णा, सहकार भारतीच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा तथा भाग्यलक्ष्मी बँकेच्या अध्यक्षा संध्याताई कुलकर्णी, सहसंघटनमंत्री विष्णू बोबडे, मधुकर कुलकर्णी, रमेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती़ अधिवेशनातून महिलांना कार्य करण्याची ऊर्जा आणि महिला सक्षमीकरणास नक्की चालना मिळेल, असा विश्वास संध्याताई कुलकर्णी यांनी व्यक्त केला़ तसेच उपस्थित राहण्याचे आवाहन केले़ (प्रतिनिधी)