शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

‘सर्वोपचार’मधील

By admin | Updated: September 14, 2015 00:46 IST

लातूर : लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील शल्यचिकित्सा विभागाचे चार शस्त्रक्रियागृह असून,

लातूर : लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील शल्यचिकित्सा विभागाचे चार शस्त्रक्रियागृह असून, यातील तीन शस्त्रक्रियागृहातील शस्त्रक्रिया करण्यासाठी लागणारे दिवे बंद असल्याने तसेच वातानुकूलित यंत्र बंद पडले आहेत़ परिणामी एकाच शस्त्रक्रियागृहात, एकाच दिव्याच्या मदतीने दिवसभरातील शस्त्रक्रिया केल्या जात आहेत़ त्यामुळे अनेक रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी हेलपाटे मारावे लागत आहेत़ तरीही सर्वोपचार प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असून, मागील दोन महिन्यांपासून रुग्णांची फरफट सुरु आहे़ लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय हे लातूर जिल्ह्यातील रुग्णांसह आंध्र व कर्नाटकामधून येणाऱ्या रुग्णांचे आधारस्थान बनले आहे़ त्यामुळे दिवसाकाठी हजार रुग्णांची बाह्यरुग्ण तपासणी होते़ तर दिवसाकाठी ५० ते १०० रुग्ण विविध आजाराच्या समस्येमुळे उपचारासाठी दाखल होतात़ या रुग्णांना अल्प दरात रुग्ण सेवा मिळत असल्याने सर्वसामान्य रुग्ण सतत येथे उपचारासाठी दाखल होतात़ शासनही वेगवेगळ्या योजनेअंतर्गत या रुग्णांच्या आरोग्यासाठी नवनवीन योजना जाहीर करत आहे़ त्या योजनांचा लाभ शासकीय रुग्णालयाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करीत आहे़ पण शासकीय रुग्णालयाच्या उदासीन प्रशासन आणि लालफितीचे धोरण यामुळे हजारो रुग्णांना उपचारापासून वंचित रहावे लागत आहे़ असाच प्रकार, सर्वोपचार रुग्णालयात होत आहे़ शल्यचिकित्सा विभागांतर्गत सुसज्ज असे चार शस्त्रक्रियागृह सुरु करण्यात आले आहेत़ यामध्ये तीन शस्त्रक्रियागृह व एक उपयुक्त लघुशस्त्रक्रियागृह असे एकूण चार शस्त्रक्रियागृह आहे़ यातील तीन शस्त्रक्रियागृह केवळ शस्त्रक्रियेसाठी लागणारे दिवे बंद असल्यामुळे बंद आहे़ एका शस्त्रक्रियागृहात एका दिव्यावर शस्त्रक्रियागृह सुरु आहे़ याच शस्त्रक्रियागृहात तीन निर्जंतुकीकरण मशीन आहेत़ यातील दोन मशीन बंद असून, एकाच मशीन सुरु आहे़ हा सर्व प्रकार संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अधिष्ठातांच्या लक्षात आणून देण्यासाठी २७ वेळा तक्रारी दिल्या आहेत़ तरीही त्याकडे व्यवस्थापन गांभीर्याने पाहत नाही़ (प्रतिनिधी)