यावेळी बोलताना डॉ. शिंदे म्हणाले की, मुलांच्या यशात पालकांचा सर्वात मोठा वाटा असतो. पालकांनी मुलांना वेळ देण्यासोबतच त्यांचे भावनिक चढ उतार समजून घेणेही आवश्यक आहे. पालकांचे मुलांशी मैत्रीपूर्ण नाते निर्माण झाले तर ते अभ्यासातील अडचणी, त्यांचे चांगले- वाईट गुण, मनातील भीती आणि स्वप्ने पालकांना सांगतील. यातून त्यांचा यशाचा मार्ग सुकर होऊ शकेल.
यावेळी डॉ. शिंदे यांनी एआयबीच्या विशेष आणि अभिनव अभ्यास पद्धतीबाबतही माहिती त्यांनी पालकांना दिली आणि संकल्पना आधारित शिक्षण हे एआयबीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य असल्याचे सांगितले. दररोज सराव पेपर, आठवड्याला टेस्ट, ग्रँड टेस्ट आणि डेली डाऊट सेक्शन विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवितात, असेही डॉ. शिंदे यांनी नमूद केले.
सूचना
डाॅ. भास्कर शिंदे यांचा सिंगल कॉलम फोटो घेणे.