शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा एक दिवसाची निर्जळी

By admin | Updated: September 11, 2014 01:26 IST

औरंगाबाद : शहराला १५ सप्टेंबरपासून निर्जळीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

औरंगाबाद : शहराला १५ सप्टेंबरपासून निर्जळीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. पितृपक्षातच पालिकेमुळे नागरिकांना पाणी-पाणी करावे लागणार आहे. पालिकेने आणि औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन मुख्य जलवाहिन्यांच्या गळत्यांची डागडुजी करण्यासाठी १५ सप्टेंबर रोजी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय आहे. मनपा जरी एक दिवस शटडाऊन घेणार असल्याचे कळविले असले तरी पाणीपुरवठ्यावर आठवडाभर परिणाम होण्याची शक्यता आहे. पालिकेने नागरिकांना पाणी साठवून ठेवण्याचे आवाहन केले आहे. जायकवाडी ते नक्षत्रवाडी एमबीआरपर्यंत पाणीपुरवठा करणाऱ्या ७००, १,२००, १,४०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिन्यांची निर्वहन क्षमता संपल्याने त्यांची चाळणी झालेली आहे. त्यामुळे त्यांना वारंवार गळती लागत आहे. जलवाहिन्यांना लागलेल्या गळतीमुळे सध्या रोज १० एमएलडी (१ कोटी लिटर) पाणी वाया जात आहे.सिडको- हडकोसह शहरात पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. जलवाहिन्यांना गळती लागलेली आहे. त्यांची डागडुजी करणे महत्त्वाचे आहे. दोन दिवसांचा कालावधी डागडुजी करण्यासाठी लागेल. दोन दिवस पाणीपुरवठा विभाग बंद ठेवण्यासाठी आजवर पदाधिकाऱ्यांनी परवानगी दिली नव्हती.काय काम करणार यंत्रणाजायकवाडी ते शहरादरम्यान या जलवाहिन्यांवर विविध ठिकाणी मोठ्या स्वरूपाच्या गळत्या आहेत. त्या गळत्या दुरुस्तीसह जायकवाडी सबस्टेशन, जायकवाडी नवीन व जुन्या योजनेचे तसेच ढोरकीन, फारोळा येथे पंप दुरुस्ती, व्हॉल्व्हची दुरुस्ती व काही यांत्रिकी, विद्युत उपकरणांच्या दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. महावितरणला मनपाने १५ लाख रुपये देऊन अपडेट केलेली वीजपुरवठ्याची यंत्रणेची जोडणीही १५ रोजी होणार आहे. शटडाऊन घेण्यासाठी आयुक्त महाजन यांनी मंजुरी दिली आहे.