शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

३ वर्षांनंतर पदाधिकारी निवड

By admin | Updated: July 9, 2017 00:42 IST

औरंगाबाद : विधानसभा, महापालिका निवडणुकीनंतर खोळंबलेल्या शिवसेना पदाधिकारी निवडीला ८ जुलै रोजी मुहूर्त लागला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : विधानसभा, महापालिका निवडणुकीनंतर खोळंबलेल्या शिवसेना पदाधिकारी निवडीला ८ जुलै रोजी मुहूर्त लागला. निवड यादी मातोश्रीवरून जाहीर करण्यात आली असून, यामध्ये पालकमंत्री रामदास कदम यांना बाजूला ठेवत खा. चंद्रकांत खैरे आणि संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांचा यादीवर प्रभाव असल्याचे दिसते आहे. १९ महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या यादीमध्ये सोशल इंजिनिअरिंगचा तोल राखण्याचा प्रयत्न झाला असला तरी काही जण नाराज झाले आहेत. त्यांनी भाजपची वाट धरण्याचा निश्चय केला आहे, तर महानगरप्रमुख या पदावर ८ जूनपासून सुरू असलेल्या नावाला सध्या पूर्णविराम मिळाला आहे. मध्य मतदारसंघातील बाळासाहेब थोरात यांच्या जागी गोपाळ कुलकर्णी यांचे नाव निश्चित होते; परंतु ८ जूननंतर थोरात यांनी खैरे गटाकडे पारडे झुकविल्यामुळे त्यांचे पद कायम राहिल्याचे बोलले जात आहे. वाघचौरे यांना घोसाळकर यांच्या जवळीकतेचे फळ मिळाल्याची चर्चा आहे. कला ओझा आणि आऊलवार या खैरे गटाच्या मानल्या जातात. जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी यांच्या जोडीला आ. भुमरे यांना देऊन त्रिवेदींचे वजन कमी करण्याचा प्रयत्न झाला आहे. मध्य मतदारसंघात शिवसेनेत उमेदवारीसाठी आतापासूनच स्पर्धा होत असल्याने पक्षाची डोकेदुखी वाढणार आहे. पूर्वमध्ये वैद्य यांना विधानसभेच्या तयारीला लागण्याचे संकेत या पदनियुक्तीतून देण्यात आले आहेत. वैद्य यांनी पश्चिम शहरप्रमुख पदावरून शनिवारी रजा घेतल्याने आ. संजय शिरसाट यांना आता संघटनेकडे लक्ष द्यावे लागणार आहे. अनिल पोलकर अडगळीला पडले होते, त्यांना प्रवाहात आणले आहे. संतोष जेजूरकर यांची उपजिल्हाप्रमुखपदी निवड करून त्यांना पक्षात कायम ठेवण्याचा प्रयत्न झाला आहे. राष्ट्रवादीतून आलेले विश्वनाथ स्वामी यांना थेट शहरप्रमुख केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पक्षाला गळती लागलेली आहे. ती गळती रोखण्याचे मोठे आव्हान नवीन पदाधिकाऱ्यांसमोर आहे.