शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

२६ जानेवारीनंतर डीपीसीतील चुकीची कामे रद्द करणार; पालकमंत्री संजय शिरसाट

By बापू सोळुंके | Updated: January 20, 2025 19:30 IST

शहर आणि ग्रामीणमधील गुन्हेगारी रोखण्यास आपले प्राधान्य असल्याचे पालकमंत्री शिरसाट यांनी नमूद केले.

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा नियोजन समितीने समान निधी वाटप केला नाही, शिवाय काही चुकीच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिल्याचे कळाले आहे, जनतेच्या पैशांचा असा अपव्यय होऊ देणार नाही. २६ जानेवारीनंतर डीपीसीची काही चुकीची कामे रद्द करणार असल्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी सोमवारी पत्रकारांना सांगितले.

ते म्हणाले की, जिल्हा नियोजन समितीची कामे काही ठेकेदारांनी रिंग करून मिळविल्याची माहिती आहे. या ठेकेदारांवर गुन्हे नोंदविण्याचा आपला मानस आहे. छत्रपती संभाजीनगर शहर आणि ग्रामीणमध्ये १० हजार बांगलादेशी नागरिक असल्याचा तसेच यातील सर्वाधिक सिल्लोड मतदारसंघात असल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. याकडे लक्ष वेधले असता शिरसाट यांनी नमूद केले की, काही लोक नकली आधारकार्ड आणि मतदारकार्डही तयार करून देतात. यामुळे बांगलादेशी नागरिकांना मदत होते. बांगलादेशी नागरिकांचा शोध घेण्यासाठी शहरात आणि ग्रामीण भागात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येणार आहे. खा. संजय राऊत यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्त्वाखाली २० आमदार शिवसेनेतून बाहेर पडणार असल्याचा गौप्यस्फोट केला. यावर त्यांनी आम्ही एकसंध आहोत, राऊत यांनी उगाच आमच्या पक्षात नाक खुपसू नये, अशा शब्दात पलटवार केला.

पोलिसांना २० नवीन स्कार्पिओ जीपशहर आणि ग्रामीणमधील गुन्हेगारी रोखण्यास आपले प्राधान्य असल्याचे पालकमंत्री शिरसाट यांनी नमूद केले. आजकाल पोलिसांपेक्षा गुन्हेगारांकडे उच्च दर्जाची वाहने असतात. यामुळे गुन्हेगारांचा पाठलाग करणे पोलिसांना शक्य होत नाही. ही बाब निदर्शनास आल्याने शहरातील पोलिसांना २० नवीन स्कार्पिओ जीप देणार असल्याचे पालकमंत्री शिरसाट यांनी सांगितले.

२३ जानेवारीपूर्वी माजी नगरसेवकांचा प्रवेशशहरातील दहापेक्षा अधिक माजी नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश होणार आहे. २३ जानेवारीपूर्वी हे प्रवेश होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Sanjay Shirsatसंजय शिरसाटShiv Senaशिवसेना