शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बालिकेच्या मृत्यूनंतर घाटीत तणाव, डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2016 01:43 IST

औरंगाबाद : थंडीताप आल्याने दोन दिवसांपासून घाटीत उपचार घेत असलेल्या ११ वर्षीय बालिकेचा बुधवारी सकाळी मृत्यू झाला. डॉक्टरांनी उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप

औरंगाबाद : थंडीताप आल्याने दोन दिवसांपासून घाटीत उपचार घेत असलेल्या ११ वर्षीय बालिकेचा बुधवारी सकाळी मृत्यू झाला. डॉक्टरांनी उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी करून डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. यामुळे काही काळ घाटीत तणाव निर्माण झाला होता. घाटी प्रशासनाने चौकशी समिती नियुक्त करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईक शांत झाले. मोनाली सुनील दाभाडे (११,रा. नंदनवन कॉलनी) असे मरण पावलेल्या मुलीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, मोनालीची प्रकृती बिघडल्याने नातेवाईकांनी तिला सोमवारी घाटीतील बालरोगशास्त्र विभागात दाखल केले. उपचारासाठी मोनाली स्वत: चालत वॉर्डात गेली होती.वॉर्ड क्रमांक २५ मध्ये तिला दाखल करण्यात आले. या विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत पाटील आणि त्यांचे सहकारी हे तिच्यावर उपचार करीत होते. डॉक्टरांच्या सांगण्यावरून नातेवाईकांनी तिची डेंग्यू तपासणी खाजगी प्रयोगशाळेतून करून आणली. प्र्रयोगशाळेच्या अहवालात तिला डेंग्यू नसल्याचे नमूद करण्यात आले होते. उपचार सुरू असताना बुधवारी सकाळी मोनालीची प्राणज्योत मालवली. हसत खेळत असलेली मोनाली सकाळी शुद्धीवर होती, असे असताना ती मरण पावल्याचे ऐकून नातेवाईकांना धक्काच बसला. डॉ. प्रशांत पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उपचारात हलगर्जीपणा केल्यानेच मोनाली दगावली. त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी करीत नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यानंतर नातेवाईकांनी प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुधीर चौधरी यांना घेराव घातला. या घटनेची माहिती मिळताच बेगमपुरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक शेख सलीम पोलीस कर्मचाऱ्यांसह दाखल झाले.