पाथरी : शहरातील जैतापूर मोहल्ला येथील उर्दू शाळेची इमारत मोडकळीस आल्याने चालू शैक्षणिक वर्षापासून शाळा बंद करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. शाळा व्यवस्थापन समितीने अखेर उर्दू शाळेसाठी झेंडे मोहल्ला येथे जागा उपलब्ध करून दिल्याने शाळेला आता नवीन इमारत मिळणार आहे. पाथरी शहरातील जिल्हा परिषदेची शाळेची शाखा आहे. ब्रँच पाथरी या नावाने शाळेची ओळख आहे. या शाखेचा एक भाग जैतापूर मोहल्ला येथे उर्दू माध्यमाची पहिली ते पाचवीपर्यंतची शाळा कार्यान्वित आहे. या शाळेला शासनाची स्वतंत्र इमारत नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून पाथरी शहरातील एका मशिदीच्या काही खोल्यांमध्ये भाडेत्त्वावर ही उर्दू शाळा चालू होती. परंतु या खोल्याही मोडकळीस आल्याने या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता. २००९ पासून ब्रँच पाथरीमधून ही उर्दू माध्यमाची शाळा स्वतंत्र करण्यात आली. यामुळे शाळेसाठी जागा उपलब्ध व्हावी यासाठी शिक्षण विभागाने मागील दोन वर्षांपासून जागेचा शोधही घेतला. परंतु जागा उपलब्ध होत नसल्याने आणि मोडकळीस आलेल्या वर्गखोल्यांमध्ये उर्दू माध्यमाची शाळा सुरू असल्याने स्थानिक शिक्षण विभागाने शिक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांना २२ मे रोजी लेखी पत्र देऊन शाळेला जागा उपलब्ध करून द्या अन्यथा उर्दू शाळा बंद करावी लागेल, असा इशारा दिला होता.७ जून रोजी शिक्षण समितीने झेंडे मोहल्ला येथे ४० बाय ८० आकाराची मोकळी जागा या शाळेसाठी उपलब्ध करून दिली आहे. याबाबतचे पत्रही स्थानिक गटशिक्षणाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी डी.आर.र णमाळे यांच्या वतीने देण्यात आली. यामुळे उर्दू शाळेसाठी आता नवीन इमारत उभा राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (वार्ताहर)शिक्षणावर होत होता परिणामपाथरी शहरातील उर्दू माध्यमाची प्राथमिक शाळेत शहरातील बहुतांश मुस्लिम समाजाचे विद्यार्थी शिक्षण घेत होते. शहरात जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमाच्या शाळांना नवीन इमारती मंजूर झाल्या. इमारतीचे बांधकामही झाले. परंतु उर्दू माध्यमाच्या प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांची संख्या मोठी वाढली असतानाही शाळेचे वर्ग मोडकळीस आलेल्या इमारतीत भरत असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही याचा विपरित परिणाम होऊ लागल्याने अखेर या शाळेला इमारत मिळणार असल्याने विद्यार्थ्यांचा प्रश्न मार्गी लागला आहे.
अखेर शाळेसाठी जागा उपलब्ध
By admin | Updated: June 8, 2014 00:53 IST