शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

अखेर औरंगाबादला जिल्हाधिकारी मिळाले; उदय चौधरी घेणार पदभार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 20:39 IST

ठाणे येथील अतिरिक्त मनपा आयुक्त सुनील चव्हाण यांच्या बदलीस स्थगिती मिळाल्यानंतर आज औरंगाबाद जिल्हाधिकारीपदी उदय चौधरी यांची नेमणूक करण्यात आली. चौधरी या आधी सिंधुदुर्ग येथे जिल्हाधिकारी पदावर कार्यरत होते. 

औरंगाबाद : ठाणे येथील अतिरिक्त मनपा आयुक्त सुनील चव्हाण यांच्या बदलीस स्थगिती मिळाल्यानंतर आज औरंगाबाद जिल्हाधिकारीपदी उदय चौधरी यांची नेमणूक करण्यात आली. यासोबतच महापालिकेच्या आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार सुद्धा त्यांच्याकडे असणार आहे. चौधरी या आधी सिंधुदुर्ग येथे जिल्हाधिकारी पदावर कार्यरत होते. 

मंगळवारी प्रशासकीय स्तरावर अत्यंत वेगाने हालचाली होत ठाणे मनपाचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांची औरंगाबाद जिल्हाधिकारीपदी झालेली बदली स्थगित करण्यात आली. तितक्याच वेगाने आज सिंधुदुर्ग येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत उदय चौधरी (भा.प्र.से) यांची येथे जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली. ते सिंधुदुर्ग येथे  जिल्हाधिकारी म्हणून 7 जून 2016 पासून कार्यरत होते. 

चौधरी यांचा अल्प परिचय मुळचे जळगाव येथील चौधरी यांची प्रशासकीय वाटचाल गडचिरोलीपासून सहायक जिल्हाधिकारी म्हणून सुरु झाली. वर्धा, ठाणे येथे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी उत्तमप्रकारे कामगिरी बजावली. उत्कृष्ट शैक्षणिक कारकीर्द असलेल्या श्चौधरी यांनी बी.टेक (मेकॅनिकल) ही पदवी प्राप्त केली असून सन 2010 मध्ये वयाच्या 25 व्या वर्षी त्यांची भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये निवड झाली.

औरंगाबादची होत आहे उपेक्षा मागील तीन-चार वर्षांपासून वर्षभराच्या आतच जिल्हाधिकारी औरंगाबादेतून बदली करून घेत आहेत. येथून बदली करून गेलेले अथवा बदली झालेल्या जिल्हाधिकाऱ्यांना चांगल्या पदावर काम करण्याची संधी मिळते आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी कुणाल कुमार हे पुण्यात बदलून गेले. विक्रमकुमार हे डीएमआयसीचे एमडी म्हणून पदोन्नतीने मुंबईत गेले. त्यानंतर आलेले वीरेंद्रसिंह हे तीन महिन्यांतच मंत्रालयात रुजू झाले. निधी पांडे यांची राजीव गांधी आरोग्य योजनेच्या सीईओपदी वर्णी लागली. त्यानंतर एन.के. राम यांची पुणे जिल्हाधिकारीपदी वर्णी लागली. म्हणजे औरंगाबादेत वर्ष-दीड वर्ष काम करायचे आणि मोठ्या जिल्ह्यांत बदलून जायचे, असा ‘ट्रेंड’ मागील काही वर्षांपासून महसूल प्रशासनात आला आहे. तीन वर्षे एकाच ठिकाणी काम करण्याच्या नियमाचे सर्रासपणे उल्लंघन होतच आहे, शिवाय दुसरीकडे पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा व मराठवाड्याची राजधानी असलेला हा जिल्हा दुर्लक्षित होत आहे.

टॅग्स :Aurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबादTransferबदलीState Governmentराज्य सरकार