शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

"सीआयएसएफ"च्या जवानांचा हरित संकल्प , "झाल्टा" गाव घेतले दत्तक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 11:19 IST

शहराजवळील झाल्टा गाव दत्तक घेऊन स्वछता अभियान आणि वृक्षारोपण उपक्रमांतून गाव स्वच्छ, सुंदर आणि हरित करण्याचा ध्यास "सीआयएसएफ"च्या जवानांनी घेतला आहे.

ऑनलाईन लोकमत

औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर कडेकोट बंदोबस्तासाठी डोळ्यात तेल घालून दिवस-रात्र पहारा देणारे ‘केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दला’चे (सीआयएसएफ) जवान सामाजिक जबाबदारी जोपासत आहेत. शहराजवळील झाल्टा गाव दत्तक घेऊन स्वछता अभियान आणि वृक्षारोपण उपक्रमांतून गाव स्वच्छ, सुंदर आणि हरित करण्याचा ध्यास "सीआयएसएफ"च्या जवानांनी घेतला आहे.

दोन वर्षांपूर्वी "सीआयएसएफ"ने हे गाव दत्तक घेतले आहे. स्वछता अभियानासह गावात व्यसनमुक्तीपर कार्यक्रम घेण्यावर भर दिला जात आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे  निसर्गाचा लहरीपणा वाढत असल्याने पर्यावरणचे रक्षण ही सर्वांची जवाबदारी आहे. पुढील पिढीला शुद्ध हवा मिळावी व दुष्काळ परिस्थीती निर्माण होऊ नये म्हणून निसर्गाचे संवर्धन करणे ही गरज आहे. हीच बाब लक्षात घेऊन "सीआयएसएफ"तर्फे या गावात ९०० रोपे लावण्याचा उपक्रम  घेण्यात आला. झाल्टा ,सुंदरवाडी ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच संजय शिंदे , रवींद्र शिंदे, अजय सुरासे, "सीआयएसएफ"चे निरीक्षक अरुण मिश्रा, मनोज कुमार, सिराज खान, उपनिरीक्षक ए.के.यादव, ई.के.पाटील, डी.एम. आमले, डी.पी.गुप्ता,जी.डी.यादव, एस.वाय.एफ.अहेमद, शेख अहेमद यांच्यासह जवान, ग्रामस्थांच्या हस्ते वृक्षारोपण करून शुक्रवारी(दि.२१)या उपक्रमाची सुरूवात झाली."सीआयएसएफ"चे उप कमांडट आलोककुमार यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
 
प्रारंभी गावातील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात रोपांची लागवड करण्यात आली. यात विद्यार्थ्यांनीदेखील उस्फुर्त सहभाग नोंदविला. लावलेल्या रोपाची स्वतः काळजी घेणार, असा विश्वासही विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. गावातील ज्येष्ठ नागरिकही मागे नव्हते. त्यांनीही यात उस्फूर्तपणे सहभागी होत गाव हरित होण्यासाठी रोपे लावली. गावातील पाण्याची टाकी, मंदिर परिसरातही रोपे लावण्यात आली. दैनंदिन कामकाज सांभाळत सामाजिक उपक्रमात सहभागी झाल्याचा आनंद प्रत्येक जवानांच्या चेह-या वर झळकत होता.