शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

लोखंडी दरवाजावरुन प्रशासनाची कोंडी

By admin | Updated: June 22, 2016 00:54 IST

औरंगाबाद : कधी कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या गेटवरून, तर कधी मागील सभेच्या अपूर्ण कार्यवृत्तांतावर प्रशासनाला कोंडीत पकडून जि.प. सदस्यांनी मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अधिकाऱ्यांना घाम फोडला.

औरंगाबाद : कधी कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या गेटवरून, तर कधी मागील सभेच्या अपूर्ण कार्यवृत्तांतावर प्रशासनाला कोंडीत पकडून जि.प. सदस्यांनी मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अधिकाऱ्यांना घाम फोडला. जि.प. अध्यक्ष श्रीराम महाजन यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा झाली. या सभेस उपाध्यक्ष दिनकर पवार, सभापती विनोद तांबे, संतोष जाधव, शीला चव्हाण, सरला मनगटे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश बेदमुथा तसेच सभेचे सदस्य सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांची प्रमुख उपस्थिती होती. सुरुवातीलाच सदस्य रामदास पालोदकर, दीपकसिंह राजपूत, मनाजी मिसाळ या सदस्यांनी मागील सभेचा इतिवृत्तांत अपूर्ण आहे, ही बाब निदर्शनास आणली. अनिलकुमार चोरडिया व अन्य सदस्यांनी मुद्दा उपस्थित केला की, अलीकडेच जिल्हा परिषदेत तीन कर्मचारी व एका अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. या घटनांमुळे जि.प.चे वाभाडे निघाले आहेत, यासंदर्भात प्रशासनाने खुलासा करण्याची मागणी केली. तेव्हा सभेचे सदस्य सचिव वासुदेव सोळंके यांनी भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश दिले. दीपकसिंह राजपूत यांनी पुन्हा एकदा ग्रामपंचायतींना कोणती कामे द्यावीत व कोणती नको, हा मुद्दा चर्चेला आणला. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश बेदमुथा यांनी सांगितले की, घटना हीच सर्वश्रेष्ठ आहे; पण ग्रामपंचायतींनी करावयाच्या कामांसंबंधी शासनाच्या काही सुधारित सूचना असतील, तर त्यासंबंधी शासनाकडून मार्गदर्शन मागवतो. प्रशासनाने केलेल्या या खुलाशावर सभागृहातील सदस्यांनी गदारोळ केला. कोल्हापुरी बंधाऱ्यांसाठी गेट खरेदीच्या प्रस्तावास सर्वसाधारण सभेची मान्यता घेण्याचा विषय चर्चेला आला. याबाबत सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले.गेट बसविल्या जाणाऱ्या बंधाऱ्यांची तालुकानिहाय स्थिती सांगण्याचा आग्रह सदस्यांनी धरला. तेव्हा प्रारंभी १५० बंधाऱ्यांना कमीत कमी ३ दरवाजे बसवले जातील, असे सांगून यादी जाहीर केली. त्यामध्ये सिल्लोड तालुक्यातील ५१ बंधारे, सोयगाव- १४, फुलंब्री- ६, कन्नड- ३५, खुलताबाद- ३, गंगापूर- ९, वैजापूर- १६, पैठण- १० आणि औरंगाबाद तालुक्यातील ४ बंधाऱ्यांचा समावेश होता. तेव्हा एकट्या सिल्लोड तालुक्यातील ५१ बंधाऱ्यांना गेट बसविले जाणार ही बाब समोर आली. यावरून सदस्यांनी अध्यक्षांनाही घेरण्याचा प्रयत्न केला.