शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडा संकुलासाठी ३.४१ कोटींचा वाढीव निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:03 IST

फुलंब्री : तालुक्यात होत असलेल्या क्रीडा संकुलाच्या कामासाठी शासनाकडून वाढीव ३ कोटी ४१ लाखांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे ...

फुलंब्री : तालुक्यात होत असलेल्या क्रीडा संकुलाच्या कामासाठी शासनाकडून वाढीव ३ कोटी ४१ लाखांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, निधी उपलब्ध होताच क्रीडा संकुलाच्या कामाला सुरुवात होणार आहे.

फुलंब्री येथील जुन्या जिनिंग प्रेसिंगच्या जागेवर तालुका क्रीडा संकुल उभारण्यासाठी दोन वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली. सुरुवातीला केवळ एक कोटी रुपये मंजूर झाल्याने अंदाजपत्रकातील कामे पूर्ण होणे अशक्य होते. सुरुवातीच्या काळात बोअरवेल, वॉल कंपाउंड, जमीन सपाटीकरण, तसेच प्रशासकीय इमारतीच्या काही भागांचे काम पूर्ण झाले. दरम्यान, कोविडमुळ‌े दीड ते दोन वर्षांपासून कामे थांबली, तर क्रीडा विभागाच्या वतीने सुधारित प्रस्ताव पाठविण्यात आला. त्यानुसार नवीन वाढीव निधीला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळ‌े ४.४१ कोटी रुपये निधी मिळणार असून, भव्य क्रीडा संकुल उभारले जाणार आहे.

--

क्रीडाप्रेमींना या सुविधा मि‌ळणार

क्रीडा संकुलामध्ये प्रामुख्याने दोन मजली इमारत केली जाणार आहे. यात पहिल्या मजल्यावर मुला-मुलींची राहण्याची व्यवस्था (वसतिगृह), तर दुसऱ्या मजल्यावर दोन बॅडमिंटन कोर्ट, एक जीम हॉल, एक भांडार गृह असेल. याशिवाय मैदानावर हॉलीबॉल, खो-खो, बास्केटबॉल, कबड्डी या खेळांकरिता स्वतंत्र मैदान तयार केले जाणार आहे.

--

वैभवात पडणार भर

फुलंब्री शहराच्या ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या क्रीडा संकुलामुळे तालुक्यातील विविध खेळांतील प्रावीण्यप्राप्त खेळाडूंना हक्काचे मैदान उपलब्ध होणार आहे. या खेळाडूंना सराव करण्यास मैदान उपयुक्त ठरेल. त्यांच्या कलागुणांना वाव मिळणार आहे. तालुक्याच्या वैभवात हे क्रीडासंकुल एक भर घालणारी वास्तू ठरणार आहे.

--

कोट

गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे काम होऊ शकले नाही, तसेच याला लागणारा निधीही मिळाला नव्हता. आता निधी येण्याचा मार्ग मोकळा झाला असून, या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. - शरद कचरे, तालुका क्रीडा अधिकारी.

-