शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

‘आदर्श’ने उचलली रेणुकाच्या शिक्षणाची जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 00:12 IST

सेनगाव येथील रेणूका तिडकेने मोलमजुरी करुन इयत्ता दहावीमध्ये ९२.४० टक्के गुण घेतले. त्यामुळे तिचे सर्वच स्तरातून कौतूक झाल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाले होते. परंतु आर्थिक परिस्थितीमुळे रेणूकाच्या आई- वडिलांना पुढील शिक्षणाची चिंता भेडसावत होती. तोच आदर्श महाविद्यालयातील शिक्षकवृंदाने रेणूकाच्या कुटुंबियाची भेट घेऊन रेणूकाच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी उचलल्यामुळे रेणूकाने ‘लोकमत’चे आभार मानले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : सेनगाव येथील रेणूका तिडकेने मोलमजुरी करुन इयत्ता दहावीमध्ये ९२.४० टक्के गुण घेतले. त्यामुळे तिचे सर्वच स्तरातून कौतूक झाल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाले होते. परंतु आर्थिक परिस्थितीमुळे रेणूकाच्या आई- वडिलांना पुढील शिक्षणाची चिंता भेडसावत होती. तोच आदर्श महाविद्यालयातील शिक्षकवृंदाने रेणूकाच्या कुटुंबियाची भेट घेऊन रेणूकाच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी उचलल्यामुळे रेणूकाने ‘लोकमत’चे आभार मानले.रेणूका अगदी लहानपणापासूनच अभ्यासात हुशार आहे. परंतु घरची हलाखीची परिस्थिती असल्याने तिनेही आपल्या आई- वडिलासोबत रोजमजुरीचे काम करुन शाळा शिकली. आपल्या अभ्यासाच्या जोरावर तिने इयत्ता दहावीत ९२.४० टक्के गुण घेतल्याने तिचे सर्वत्र कौतुक झाले. विशेष म्हणजे जि. प. सीईओ डॉ. एच. पी. तुम्मोड यांनीही प्रत्यक्ष रेणूकाची भेट घेऊन शिक्षणासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले होते. त्याच अनुषंगाने आदर्श महाविद्यालयाचे संस्थाअध्यक्षांनी विद्यार्थिनीच्या शिक्षणाची जाबबदारी उचलण्याची तयारी दाखविल्यानंतर जुक्टा संघटनेचे अध्यक्ष प्रा. ए. एस. पांपटवार, एन. एस. रहिलवार, प्रा. राम तोडकर, पडोळे, कांप्रतवार यांनी रेणूकाची भेट घेऊन तिचा ११ विज्ञानला निशुल्क प्रवेश करुन घेतला. शिवाय तिला वह्या, पुस्तकेही उपलब्ध करुन देत तिच्या दोन वर्षे शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे. विशेष म्हणजे प्राचार्य डॉ. ए. आर. लाठी आणि उपप्राचार्य सामलेटी, पर्यवेक्षिका इंदानी यांनी प्रवेशासाठी पाठपुरावा केला. तर ‘लोकमत’मुळे एका हुशार व होतकरु विद्यार्थिनीचा आधार बनता आल्याचे जुक्टा संघटनेचे अध्यक्ष ए. एस. पांपटवार यांनी सांगितले. यातून खरोखरच विद्याििर्थनीला जिवनात यश मिळण्यास मदत होईल.