उस्मानाबाद : खैरलांजी, कानपूर येथील घटनेच्या निषेधार्थ ३० नोव्हेंबर २००६ रोजी उस्मानाबादेत पुकारण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान दंगल उसळली होती़ यावेळी एका युवकाचा मृत्यू तर एका पोलीस निरीक्षकासह पाच ते सहा कर्मचारी जखमी झाले होते़ या प्रकरणात न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान सतत गैरहजर राहणाऱ्या पाच जणांना न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी सोमवारी सकाळी अटक करून न्यायालयात हजर केले होते़ न्यायालयाने या पाचही जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे़पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खैरलांजी व कानपूर येथील घटनेच्या निषेधार्थ उस्मानाबाद शहरात ३० नोव्हेंबर २००६ रोजी आंदोलन करण्यात आले होते़ मात्र, अचानक या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने दंगल उसळली होती़ यावेळी काही आंदोलकांनी हातात तलवार, काठ्या, दगड घेवून पोलिसांवरच हल्ला चढविला होता़ यात एका पोलीस निरीक्षकासह पाच ते सहा पोलीस कर्मचारी जखमी झाले होते़ तर एका युवकाचा मृत्यू झाला होता़ या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ या प्रकरणाचा तपास झाल्यानंतर जवळपास ८ वर्षानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते़ मात्र, जानेवारी, फेब्रुवारी, एप्रिल महिन्यात आरोपितांना न्यायालयात हजर राहण्याबाबत वॉरंट काढण्यात आले होते़ मात्र, तरीही संबंधित आरोपित न्यायालयात हजर राहत नव्हते़ त्यानंतर न्यायालयाने पोलिसांवर ताशेरे ओढत २६ मे पूर्वी संबंधितांना अटक करून न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले होते़ न्यायालयाच्या आदेशानंतर सोमवारी सकाळी शहर पोलिसांनी आरोपित किरण माळाळे, विकास बनसोडे, अंगुल बनसोडे, दत्ता कांबळे उर्फ डीके, दादासाहेब जेटीथोर या पाच जणांना अटक करून न्यायालयात हजर केले़ न्यायालयाने या आरोपितांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे़ (प्रतिनिधी)
दंगल प्रकरणी तिघांवर कारवाई
By admin | Updated: May 26, 2015 00:46 IST