लोहारा : तालुक्यातील जेवळी येथील ग्रामपंचायतच्या बैठकीत किरकोळ कारणावरून दोन गटांत झालेल्या हाणामारी प्रकरणी १४ जणांविरूध्द लोहारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना बुधवारी सकाळच्या सुमारास घडली़ पोलिसांनी सांगितले, जेवळी येथील महिला केंद्राच्या सभागृहात बुधवारी सकाळी ग्रामपंचायतची बैठक सुरू होती़ यावेळी ग्रामपंचायत सदस्या छायाबाई श्रीशैल कोराळे यांचे पती श्रीशैल कोराळे, मुलगा बालाजी कोराळे व बसवराज कोराळे यांनी उपसरपंच मल्लीनाथ डिगे यांना ग्रा.पं. सदस्यांचे पती माझ्या वार्डात काही काम न करता पैसे उचललात या कारणावरून शिवीगाळ करीत त्यांनी व त्याच्या सहकार्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली़ त्यावेळी बसवराज कोराळे यांनी त्यांच्या हातातील कुºहाड मल्लीनाथ डिगे यांना मारण्यासाठी उगारली असता वैजनाथ डिगे यांनी डाव्या हाताने उडविण्याचा प्रयत्न केला असता उजव्या हाताच्या तळ हातास कुºहाडीचा मार लागला़ तसेच जिवे मारण्याची धमकी दिली़ वैजनाथ इराप्पा डिगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील चार जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ याच प्रकरणात ग्रा.पं. सदस्या छायाबाई श्रीशैल कोराळे यांनी लोहारा पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, उपसरपंच मल्लिनाथ डिगे, चनप्पा डिगे, श्रीशैल डिगे, ओमकार डिगे, सुरज डिगे, आदीनाथ डिगे, राजेंद्र डिगे, जगन्नाथ डिगे, वैजिनाथ डिगे व दिलीप डिगे या दहा जणांनी बुधवारी दुपारी कोराळे यांच्या शेतातील घरात घुसून पती श्रीशैल, मुलगा बालाजी यांना सकाळच्या भांडणाची कुरापत काढून बेल्ट, लाथाबुक्क्याने मारहाण करून जखमी केले़ या प्रकरणी वरील दहा जणांविरूद्ध लोहारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोहेकॉ गालीब पठाण हे करीत आहेत़ (वार्ताहर)
ग्रामपंचायतीच्या बैठकीत हाणामारी
By admin | Updated: May 10, 2014 23:52 IST