उस्मानाबाद : तिर्रट, कल्याण मटका खेळणाऱ्या-खेळविणाऱ्या पाच जुगाऱ्यांवर बुधवारी पोलिसांनी ठिकठिकाणी कारवाई केली़ या प्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़उमरगा पोलिसांनी शहरात कल्याण नावाचा मटका खेळणाऱ्या-खेळविणाऱ्या मुक्या राम स्वामी, विठ्ठल तुळशीराम कांबळे (दोघे राग़ुंजोट) यांच्याविरूध्द कारवाई केली़ या कारवाईत १८०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ तर शहरातीलच एका लॉजसमोर कल्याण नावाचा मटका खेळणाऱ्या-खेळविणाऱ्या सत्यानंद शेखर रेड्डी, महेबूब पाशा नदाफ, शांतकुमार बिलाल मादगड (सर्व रा़उमरगा) या तिघाविरूध्द कारवाई केली़ यावेळी ३५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात करून उमरगा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. (प्रतिनिधी)
जुगाऱ्यांवर कारवाई
By admin | Updated: June 27, 2014 00:27 IST