अहमदपूर : गौण खनिजाची अवैध वाहतूक करणाऱ्या आठ टिप्पर चालकावर गुरुवारी पहाटे तहसील कार्यालयाच्या पथकाने कारवाई केली़ ताब्यात घेण्यात आलेली ही वाहने तहसील परिसरात लावण्यात आली आहेत़ गेल्या काही दिवसापासून गौण खनिजाची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जात आहे़ शासनाकडे रॉयल्टी न भरता वाळुची विक्री करण्यात येत आहे़ यासंदर्भात अहमदपूर तहसीलकडे वारंवार तक्रारी येत असल्याने गुरुवारी पहाटे तहसीलच्या एका पथकाने अचानक धाडी टाकल्या़ या पथकाने अमजद पटेल (लातूर) (एमएच ०४, एफ यु़ ७५२९), इब्राहिम जलील अहमद (एमएच २४, ए़बी़५०१२), सागर कोटगीरे (हडोळती) (एमएच २४, जे ७००८), सिकंदर सय्यद (एमएच २४, एबी ८६८७), ख्वाजा तांबोळी (एमएच ३६, एफ ५६१), बाबा पाटील (एमएच १९, झेड ३१९८) तसेच एम़एच़२४, जे ९०४०, एम़एच़ ०४, जे़ सी़ २५२७ ही वाहने ताब्यात घेतली आहेत़ पकडण्यात आलेली ही वाहने तहसीलच्या परिसरात उभी करण्यात आली आहेत़ या पथकाने टिप्पर चालकाजवळील कागदपत्रांची पाहणी केली असता पावत्यावर खाडाखोड असल्याचे आढळून आले़ तसेच वाळूची वाहतूक करताना त्यावर झाकण्याकडे दुर्लक्ष करणे, शासनाचा कर बुडविणे, असे आरोप ठेवण्यात आले आहेत़ या पथकात तहसीलदार विक्रम देशमुख, तलाठी विलास धोंडगे, मधू क्षीरसागर, एस़बीग़ायकवाड, चालक जलील शेख यांचा समावेश होता़ जप्त करण्यात आलेल्या एका टिप्परचे मालक अमजद पटेल यांनी ९ हजार ६०० रूपयांचा दंड भरल्याने त्यांचे टिप्पर सोडण्यात आल्याची माहिती देण्यात आली़ (वार्ताहर)काही पावत्यांवर खाडाखोड़़़ कारवाई करण्यात आलेल्या टिप्पर चालकांकडे महसूल कर भरल्याच्या पावत्या नाहीत़ ज्यांच्याकडे या पावत्या आहेत, त्यावर खाडाखोड करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे़ या टिप्पर चालकावर दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी सांगितले़
वाळूच्या आठ टिप्पर चालकांवर कारवाई
By admin | Updated: July 26, 2014 00:39 IST