शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

‘भूमिगत’मध्ये कारवाईचा आसूड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 00:58 IST

शहर अभियंता सखाराम पानझडे, उपअभियंता अफसर सिद्दीकी, उपअभियंता ए.डी. काकडे, कनिष्ठ अभियंता अनिल तनपुरे यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : भूमिगत गटार योजनेत मंगळवारी मनपा आयुक्त डी.एम. मुगळीकर यांनी अचानक कारवाईचा आसूड उगारला. ४६४ कोटी रुपयांच्या योजनेत अनेक आर्थिक अनियमितता झाल्याचे प्राथमिक लेखापरीक्षण अहवालात समोर आले आहे. या प्रकरणात शहर अभियंता सखाराम पानझडे, उपअभियंता अफसर सिद्दीकी, उपअभियंता ए.डी. काकडे, कनिष्ठ अभियंता अनिल तनपुरे यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या. भूमिगतचे काम पाहणा-या फोट्रेस या प्रकल्प सल्लागार कंपनीला आपणास ब्लॅकलिस्ट का करण्यात येऊ नये, अशी नोटीस पाठविली आहे.भूमिगत गटार योजनेतील अनियमितता शोधण्यासाठी स्थायी समितीने मनपाच्या मुख्य लेखापरीक्षक दीपाराणी देवतराज यांची नियुक्ती केली होती. त्यांनी आपला प्राथमिक अहवाल पंधरा दिवसांपूर्वीच स्थायी समिती, मनपा आयुक्तांना सादर केला. ४० पानांच्या या अहवालात योजनेतील अनेक अनियमिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. या अहवालाच्या आधारावर मागील आठवड्यात स्थायी समितीत जोरदार चर्चा झाली. सभापती गजानन बारवाल यांनी योजनेचे प्रमुख अफसर सिद्दीकी यांना निलंबित करावे, पीएमसी म्हणून आपल्या कर्तव्यात कसूर केल्याबद्दल फोट्रेस कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्याचे आदेश आयुक्तांना दिले. आयुक्तांनी स्थायी समितीच्या आदेशावर कोणताही निर्णय घेतला नाही. अफसर सिद्दीकी, फोट्रेस कंपनीला नोटीस दिली. दोघांनी आयुक्तांकडे खुलासाही सादर केला. उद्या बुधवारी होणा-या स्थायी समितीत यासंदर्भातील अनुपालन अहवाल सादर होणार आहे.